प्रकाश आंबेडकर पोलीसांच्या ताब्यात; वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणा वरून वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज मोर्चा काढला. विधानभवन परिसरात वंचित आघाडीचा मोर्चा चालू असताना पोलिस आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यात धरपकड झाली. दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण वरून राज्य आणि केंद्र सरकारवर तिया केली. सरकार कडून दडपशाही सुरु आहे असा आरोप त्यांनी केला

सरकार पूर्णपणे ओबीसींच्या विरोधात आहे, तसेच गरीब मराठ्यांच्या विरोधात सुद्धा आहे. यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचे वाटोळे केलं तसेच ओबीसींच्या आरक्षणाचे वाटोळं करण्याचे चालले आहे म्हणून आम्ही या सरकारच्या विरोधात लढा उभा केला आहे आणि गावपातळीवर आणि जिल्हा पातळीवर आम्ही हा लढा नेऊ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकार हेच या आरक्षणामागील सर्वात मोठी अडचण आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. केंद्राने जे अफीडिवेत दाखल केले आहे कि आम्ही कास्ट बेस सेन्सेक्स करू शकत नाही तेच मुळात चुकीचे आहे असे त्यांनी म्हंटल कारण सुप्रीम कोर्टाने कास्ट बेस सेन्सेक्स मागितले आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल

Leave a Comment