Vande Bharat Bullet Train : वंदे भारत बुलेट ट्रेन सुटणार सुसाsssट ! ; जाणून घ्या सर्व काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Bullet Train : भारतीयांमध्ये रेल्वेची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाकडून अनेक नव्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत यापैकी एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’ आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी या गाडीला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. मात्र आता याहून खुशखबर म्हणजे लवकरच वंदे भारत बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून भारतीय रेल्वेत बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे भारतात तयार होणाऱ्या या बुलेट ट्रेनचा वेग ताशी 250 किलोमीटर असेल. माध्यमांच्या अहवालानुसार, भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षात 2 मानक गेज बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) तयार करण्याचे काम इंटिग्रल कोच फॅक्टरीला सोपवले आहे. ताशी 250 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या भारतात बनवण्याची ही पहिलीच वेळ असेल. या दोन्ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरवर धावतील.

250 किलोमीटर प्रति तास वेग

याबाबत माहिती देताना एका आधकाऱ्याने सांगितले की, ICF, चेन्नईला दोन स्टँडर्ड गेज ट्रेन सेट तयार करण्यास सांगितले आहे, ज्याचा वेग 220 किलोमीटर ते 250 किलोमीटर प्रति तास दरम्यान असेल. आयसीएफ चेन्नईला ही ऑर्डर काही आठवड्यांपूर्वीच लावेकडून मिळाली आहे. आता वंदे भारत बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी जपानी रोलिंग स्टॉक पुरवठादार हिताची आणि कावासाकी यांच्याशी बोलणी सुरू आहेत.2018 मध्ये 10 डब्यांची बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) तयार करण्यासाठी 389 कोटी रुपये खर्च आला होता. परंतु, 2023 मध्ये हा खर्च वाढून 460 कोटी रुपये झाला आहे. जपानी कंपनी बुलेट ट्रेनचा पुरवठा करण्यास तयार आहे पण रेल्वे या ऑफर किंमतीत खरेदी करण्यास तयार नाही.

ICF द्वारे तयार केल्या जातात ट्रेन (Vande Bharat Bullet Train)

भारतात बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत आहे. यापूर्वी हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रातील भूसंपादनामुळे त्याचे बांधकाम लांबले. दुसरीकडे, आयसीएफ निर्धारित मुदतीपर्यंत ताशी 250 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन विकसित करेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. वंदे भारत गाड्या चेन्नईतील भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) द्वारे तयार केल्या जात आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर बुलेट ट्रेन (Vande Bharat Bullet Train) उभारण्याची तयारी सुरू आहे.