Vande Bharat Express : संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन खूप कमी वेळेत ही ट्रेन प्रवासांच्या पसंतीस उतरली असून राज्यभरातून देखील या ट्रेनच्या काही फेऱ्या होत असतात. मात्र शिर्डी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असुविधेचा सामना करावा लागला. कारण या प्रवाशाच्या जेवणामध्ये चक्क मेलेलं झुरळ सापडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वंदे भारत च्या केटरिंग सर्विस वर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवाशाने ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत झुरळ सापडल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत तक्रार केली आहे. त्यानंतर मात्र ही पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरी (Vande Bharat Express) यावर व्यक्त होत आहेत.
काय आहे घटना? (Vande Bharat Express)
मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत शिर्डीहून मुंबई येणाऱ्या ट्रेनमध्ये रिक्की जयस्वानी नावाचा प्रवासी प्रवास करीत होता. यावेळी ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या जेवणात त्याला झूरळ सापडलं. त्यानंतर त्याने आय आर सी टी सी कडे लेखी तक्रार केली. या प्रवाशाने याबाबतचा एक व्हिडिओ आणि फोटो एक्स या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला (Vande Bharat Express) आहे.
Services Sainagar Shirdi . @VandeBharatExp @PMOIndia @AshwiniVaishnaw @RailMinIndia pic.twitter.com/QDVlKtJLps
— Dr Divyesh Wankhedkar (@DrDivyesh1) August 19, 2024
या प्रवाशाने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहले आहे की, “आम्ही वंदे भारत ट्रेनने शिर्डीवरून मुंबईला येत होतो त्यावेळी आम्हाला देण्यात आलेल्या जेवणातील डाळीत एक मृत झुरळ सापडला आहे. मॅनेजरनेही याला दुजोरा दिला आहे. आम्ही या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. हा नवा भारत आहे” असा संताप या प्रवाशांने व्यक्त केलाय. या वापरकर्त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये मृत झुरळ (Vande Bharat Express) स्पष्ट दिसत आहे.
काय आहे IRCTC चे म्हणणे ?
दरम्यान या पोस्टला उत्तर देताना आय आर सी टी सी ने म्हंटले आहे की, ” सर तुम्हाला झालेल्या गैरसोयी बद्दल मनापासून खेद आहे. या प्रकरणाकडे अतिशय गांभीर्याने पाहिले गेले असून सेवा पुरवठा करणाऱ्यालाही दंड ठरवण्यात (Vande Bharat Express) आला आहे. तसेच सेवा देणाऱ्यांच्या स्वयंपाक घरातील युनिटची पूर्ण तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे”.