Vande Bharat Express : संपूर्ण भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रवाशांच्या सोयी करता रेल्वे कडूनही खास उपाययोजना केल्या जातात. रेल्वेचा प्रवास हा अधिक सुखकारक कमी वेळेत आणि आरामदायी व्हावा म्हणूनच रेल्वे कडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वंदे भारत ट्रेन. वंदे भारतला कमी वेळामध्ये खूप लोकप्रियता मिळाली आहे. आता पुण्याहून वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांकरिता एक आनंदची बातमी आहे. पुणे ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद ते पुणे अशी वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्याच्या सूचना भारतीय रेल्वे विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या वर्षाच्या शेवटीपर्यंत या गाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.
प्रवासाचा कालावधी 2 तासांनी कमी (Vande Bharat Express)
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे या वर्षाच्या अखेरीस वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे. जी गाडी राजधानी एक्सप्रेसच्या तोडीची असेल उल्लेखनीय म्हणजे, वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Express) देखील सिकंदराबाद-पुणे मार्गावरील जुन्या वर्कहॉर्स शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेण्याची शक्यता आहे. सध्या, शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद-पुणे मार्गावर धावते आणि दोन शहरांमधील प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे 8 तास 30 मिनिटे लागतात. सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभव देण्यासोबतच या प्रवासाचा कालावधी किमान दोन तासांनी कमी करेल.
दरम्यान बहुप्रतिक्षित वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Express) ट्रेनच्या रोलआउटच्या तयारीच्या अंतिम टप्प्यात रेल्वे अजूनही असल्याने, सिकंदराबाद-पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेनची वेळ आणि थांबा अद्याप ठरलेला नाही. सेवा सुरू होताच हे उघड होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सिकंदराबाद मार्गावरील वंदे भारत गाड्या (Vande Bharat Express)
सिकंदराबाद मार्गावर सध्या पाच वंदे भारत गाड्या धावतात; सिकंदराबाद – विशाखापट्टणम, सिकंदराबाद – तिरुपती, तिरुपती – सिकंदराबाद, काचेगुडा – यशवंतपूर (हैदराबाद – बेंगळुरू) आणि विजयवाडा – MGR चेन्नई सेंट्रल.