Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कसा असेल रूट?

Vande Bharat Express : संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. रेल्वे सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातही पूर्णपणे स्वदेशी असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. आता वंदे भारताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असून मुंबईतून उत्तर महाराष्ट्र मार्गे देशातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. सध्याच्या वंदे भारत (Vande Bharat Express) बाबत बोलायचं झालं तर या ट्रेन चेअर कार प्रकारातील आहेत. मात्र लवकरच स्लीपर ट्रेन सुद्धा उपलब्ध होणार आहेत

सध्या देशातल्या 52 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत हि ट्रेन सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गावर (Vande Bharat Express) या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद बघता वंदे भारत स्लीपर ट्रेन वर्जन लॉन्च केले जाणार आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे चेअरकार वंदे भारत ट्रेन पेक्षा स्लीपर वंदे भारत ट्रेनचा वेग हा कमी असणार आहे. मात्र वंदे भारत चेअर कारच्या तुलनेने ही गाडी आरामदायी असणार आहे

नव्या स्लीपर ट्रेनचा महाराष्ट्राला लाभ (Vande Bharat Express)

नव्याने सुरू होणाऱ्या मुंबई ते वाराणसी स्लीपर वंदे भारत ट्रेन ही महाराष्ट्रातील मनमाड, जळगाव मार्गे बरेली कडे जाणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला या गाडीचा फायदा होणार आहे. यामुळे खानदेशासहित संपूर्ण (Vande Bharat Express) उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मुंबईकडे सुसाट जाता येणार आहेत

कसा असेल रूट ? (Vande Bharat Express)

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते बरेली या दरम्यान चालवण्यात येणार आहे. रेल्वे विभागाकडून या गाडीला अंतिम रूप देण्यात आले आहे. ही गाडी 16 कोची असणार असून यामध्ये 11 थर्ड एसी चे कोच, चार सेकंड एसी चे कोच आणि एक फर्स्ट एसी चा कोच राहणार आहे. तर या गाडीची प्रवासी संख्या ही 823 इतकी असणार असून मुंबई ते बरेली (Vande Bharat Express) हा प्रवास 11 तासात पूर्ण होणार आहे. याबरोबरच मुंबई ते आग्रा हा प्रवास दहा तासात पूर्ण होईल. सध्या हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 27 तासांचा कालावधी लागतो. मात्र ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.