Vande Bharat Halt At Shegaon : शेगावला थांबणार ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस; प्रवाशांना मोठा फायदा

Vande Bharat Halt At Shegaon
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Halt At Shegaon । नागपूर- पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आता शेगाव मध्येही थांबा मिळणार आहे. रेल्वे विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. खरं बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शेगावला थांबा मिळण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या मागणीला यश आलं असून शेगावकरांना मोठा फायदा होणार आहे. तसेच गजानन महाराजांच्या मठाला भेट देणाऱ्या भक्तांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.

विदर्भाची पंढरी म्हणजे शेगाव- Vande Bharat Halt At Shegaon

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील कनेक्टिव्हिटी आणखी वाढवण्यासाठी रेल्वे विभाग येत्या १० ऑगस्ट पासून नागपूर पुणे वंदे भारत ट्रेन चालवणार आहे. २ दिवसापूर्वी या वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक आणि संभाव्य थांब्याची यादीही समोर आली होती. त्यामध्ये अजनी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड या स्थानकांचा समावेश होता. मात्र शेगावचं नाव यामध्ये नव्हते. यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती आणि शेगावला या नागपूर – पुणे वंदे भारतचा थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या मागणीला यश आलं. दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर रेल्वे विभागाने एक परिपत्रक जारी करत शेगावला थांबा (Vande Bharat Halt At Shegaon) मिळाल्याचे जाहीर केलं. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रसिद्ध संत गजानन महाराज संस्थानला जाणाऱ्या भक्तांचे काम सोप्प झालं आहे. देशभरातून भाविक विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे येतात.

कस असेल ट्रेनचं वेळापत्रक –

ट्रेन क्रमांक २६१०२ अजनी (नागपूर)- पुणे वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनीहून निघेल आणि त्याच रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल. परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक २६१०१ पुणे-अजनी (नागपूर) पुण्याहून सकाळी ६:२५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६:२५ वाजता अजनीला पोहोचेल. ही ट्रेन आठवड्यातील सहा दिवस धावेल… दर सोमवारी अजनीहून आणि मंगळवारी पुण्याहून…..

यापूर्वी पुण्याहून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला ये जा करण्यासाठी तब्बल १३-१४ तास लागायचे. मात्र आता वंदे भारत ट्रेनमुळे (Nagpur Pune Vande Bharat Express) हाच प्रवास १२ तासांवर आला आहे. म्हणजेच प्रवाशांचा वेळ २ तासांनी वाचणार आहे. सुरुवातीला हि स्लिपर ट्रेन नसेल, त्यामुळे प्रवाशांना बसून प्रवास करावा लागेल.