Vande Bharat Sleeper : देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वी ; कधीपासून सुरु होणार ट्रेन ?

vande bharat sleeper
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bharat Sleeper : देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल रन यशस्वी ; कधीपासून सुरु होणार ट्रेन ?जुनी भारतीय रेल्वे आणि आताची भारतीय रेल्वे या मध्ये तुम्हाला खूप मोठा फरक दिसेल. एवढेच नाही तर आता रेल्वेचा प्रवास हा अधिक आरामदायी वेगवान आणि सोयीस्कर सुद्धा झाला आहे. त्यातही वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे भारतीय रेल्वेचा यशस्वी पाऊल म्हणावं लागेल. आपल्या आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत आता नव्या रूपात म्हणजे ‘वंदे भारत स्लीपर’ वर्जन मध्ये येत आहे. ही गाडी कशी असेल? काय असेल ?कुठल्या मार्गावरून धावेल? त्याचे तिकीट किती असेल ? याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आधीच उत्साह आहे. त्यात आता एक आनंदाची बातमी वंदे भारतच्या (Vande Bharat Sleeper) चाहत्यांसाठी मिळाली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल ही राजधानी मुंबईत पार पडली आणि त्यात संदर्भातला एक फोटो आणि व्हिडिओ आता समोर आला आहे.

वंदे भारत स्लीपर ची ट्रायल रन (Vande Bharat Sleeper)

मुंबई सेंट्रल स्थानकावर आज मुंबई-अहमदाबाद अशी वंदे भारत स्लीपर ची ट्रायल रन घेण्यात आली. भारताची नव्या रूपाची प्रीमियम ट्रेन म्हणून ही ट्रेन ओळखली जाते. ही ट्रेन आता रुळावर धावण्यास लवकरच सज्ज झाली आहे. सध्या तिच्या चाचणीचा काळ सुरू आहे. सध्या धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ह्या चेअर कार स्वरूपातल्या आहेत. तर लवकरच स्लीपर ट्रेन्स वंदे भारत सुद्धा येणार आहेत. ज्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून तब्बल 130 के एम पी एच वेगानं वंदे भारत स्लीपर आज अहमदाबाद ते मुंबई या दरम्यान (Vande Bharat Sleeper) धावली.

कधी सुरु होणार वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper)

सध्या तरी वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग कसा असेल? हे समोर आलेलं नसलं तरी पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही दिल्ली ते मुंबई किंवा दिल्ली ते कोलकता दरम्यान चालवली जाण्याची शक्यता आहे. यासाठी ट्रेनची ट्रायल रन घेतली जात असून त्यामध्ये ताशी 160 ते 180 किलोमीटर वेगाने ट्रेन चालवली जात आहे जानेवारीअखेर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

काय आहे खासियत ? (Vande Bharat Sleeper)

वंदे भारत स्लीपर ट्रेनची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे या गाडीचा कम्फर्ट. आरामदायी बर्थ स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स हाय स्पीड वायफाय रिडिंग लाईट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉईंट यासारख्या सुविधा आगामी वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper) असणार आहेत ही ट्रेन लवकर रुळांवर धावणार असून सुरुवातीला ती देशातल्या काही मोजक्या मार्गांवर धावेल.

BEML कडून तयार करण्यात आलेल्या पहिल्या प्रोटोक मध्ये एकूण 16 कोच असतील ज्यामध्ये 11 AC 3 टियर कोच, 4 AC 2 टियर कोच आणि एक AC फर्स्ट क्लास कोच असतील. तसेच दोन डबे एसएलआर असतील. ही 16 डब्यांची ट्रेन एकूण 823 प्रवाशांना वाहून नेण्यासाठी (Vande Bharat Sleeper) तयार करण्यात आली आहे, ज्यात एसी 3 टायरमध्ये 611 बर्थ, एसी 2 टायरमध्ये 188 बर्थ आणि एसी 1 मध्ये 24 बर्थ असतील.