Vande Bharat Sleeper Train : रेल्वेचा मेगा प्लॅन!! 2029 पर्यंत देशात 250 वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस , अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आल्याने प्रवास सोप्पा आणि आरामदायी झाला आहे तर बुलेट ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, वंदे मेट्रो या रेल्वेगाड्यांचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. 2029 पर्यंत देशात 250 वंदे भारत स्लीपर ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) रुळावर धावणार असं त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेचं जाळं आणखी विस्तारणार असून देशवासीयांच्या प्रवास सोप्पा होणार आहे.

2 दोन महिन्यांत वंदे भारत स्लीपर ट्रेन येणार – Vande Bharat Sleeper Train

वंदे भारत स्लीपर क्लास ट्रेन (Vande Bharat Sleeper Train) या स्व-चालित गाड्या आहेत ज्यामध्ये राजधानी एक्स्प्रेसपेक्षा चांगले फीचर्स मिळतात. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे काम बरेच पूर्ण झाले असून या ट्रेनचे फिनिशिंगचे काम सुरू आहे. येत्या २ दोन महिन्यांत वंदे भारतची पहिली स्लीपर ट्रेन रुळावर धावणार आहे. तर साल 2029 पर्यंत 250 ते 300 वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत असतील.

सरकारवर बोजा वाढला –

यावेळी अश्विनी वैष्णव यांनी राष्ट्रीय वाहतूकदाराच्या कमकुवत आर्थिक स्थितीवर सुद्धा भाष्य केलं. तिकिटांवर मोठ्या प्रमाणात सबसिडी देणे हे यामागील एक प्रमुख कारण असल्याचे त्यांनी म्हंटल. सामान्य परिस्थितीत, जर एखाद्या उत्पादनाची किंमत १०० रुपये असेल तर आम्ही ते १०५-११0 रुपयांना विकू. मात्र रेल्वे तिकिटांच्या बाबतीत सरकार 55 रुपये आपल्या खिशातून देत आहे. सरकारचा वार्षिक अनुदानाचा बोजा ५९,००० कोटी रुपये आहे, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

रेल्वेमध्ये होत असलेल्या अभूतपूर्व कवच सिस्टीमबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेचे उपकरण म्हणून कवच सिस्टीमला पेटंट मिळाले आहे. ट्रेनमध्ये कवच सिस्टीम बसवली जात आहे. गाड्यांमध्ये कवच प्रणाली बसवण्यापूर्वी, ट्रॅक आणि स्थानकांवर डेटा सेंटर डेव्हलप केले जात आहेत. कवच प्रणाली 6,000 किमीच्या मार्गावर इंस्टाल केली जात असून या सिस्टीम मुळे रेल्वे सध्यापेक्षा जास्त गाड्या रुळांवर चालवू शकेल.