कमी वेळात आरामदायी सफर घडवणारी ट्रेन म्हणून ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेनचा नावलौकिक देशभर आहे. म्हणूनच देशभरातल्या वेगवेगळ्या भागात वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुरु करण्यात येत आहेत. माहितीनुसार येत्या 15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या 10 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये नागपूर -पुणे या ट्रेनचा समावेश करण्यात आला आहे.
सध्या देशभर कार चेअर असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. मात्र लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन्स सुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून 15 तारखेला उदघाटन होणारी नागपूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कोचची असल्याचे म्हंटले आहे. एवढेच नाही तर या लक्झरी ट्रेनचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे व्हिडीओ ?
काय आहे व्हिडीओ ?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मध्ये सुरुवातीलाच “वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपूर ते पुणे, 15 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत” असा मजकूर देण्यात आलेला आहे. त्यानंतर या ट्रेन बाबतचे एकापाठोपाठ एक सीन दाखवण्यात आले आहेत. यामध्ये ही गाडी बाहेरून कशी दिसते इथे पासून ते आत मध्ये त्याची असलेली सेटिंग अरेंजमेंट इथपर्यंत सर्व गोष्टी दाखवण्यात आले आहेत. या गाडीच्या खिडक्यांवरून दिसून येते की ही गाडी पूर्णपणे एसी आहे. शिवाय या गाडीमध्ये प्रवास करण्यासाठी आरामदायी सीट्स सुद्धा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ह्या व्हिडिओची झलक जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला नक्कीच या ट्रेनमध्ये प्रवास करावा असा वाटेल. मात्र या गाडीबाबत कोणतेही अधिकृत माहिती रेल्वे खात्याकडून समोर आलेली नाही.
nagpurkar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वंदे भारत स्लीपर ट्रेन नागपुर ते पुणे १५ सप्टेंबर पासुन आपल्या सेवेत..” असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलेय, “किती तिकिट आहे, फ्लाइटपेक्षा जास्त नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरं नाही. हा तीन महिन्याचा ट्रायल पिरेड आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे अजून पर्यंत निश्चित नाही. फक्त प्रस्ताव आहे.” काही युजर्सनी खोट्या बातम्या पसरवू नये, असा सल्ला दिला आहे.