Vande Bharat Train : भारताच्या सर्वात लोकप्रिय वंदे भारत एक्सप्रेस आता दिल्ली ते काश्मीरसाठी थेट ट्रेन सेवा सुरू करत आहे. 2025 मध्ये सुरू होणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्लीतून निघून 13 तासांत श्रीनगरपर्यंत पोहोचेल. ही ट्रेन मार्गात अंबाला कँट, लुधियाना, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी कटरा आणि बनिहाल येथे थांबेल.
दिल्ली ते श्रीनगर – फक्त 13 तासांत प्रवास
ही ट्रेन दिल्लीहून रात्री बसल्यानंतर आणि सकाळी काश्मीरमध्ये उतरता येणार आहे. नवी दिल्लीहून ही ट्रेन संध्याकाळी 7 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता श्रीनगर पोहोचेल. ही ट्रेन उधमपूर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक (USBRL) मार्गावर धावेल.
कोणत्या मिळतील सुविधा (Vande Bharat Train )
प्रवाशांच्या आरामासाठी उंच प्रतीच्या स्लीपर कोचेस:
11 एसी 3-टियर कोच
4 एसी 2-टियर कोच
1 फर्स्ट एसी कोच
वातानुकूलित डबे, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट सेवेची हमी
तिकिट दर (Vande Bharat Train )
- एसी 3-टियर: ₹2,000 (अंदाजे)
- एसी 2-टियर: ₹2,500 (अंदाजे)
- फर्स्ट एसी: ₹3,000 (अंदाजे)
कुठे घेणार थांबा ? (Vande Bharat Train )
अंबाला कँट,लुधियाना, जम्मू तवी,श्री माता वैष्णो देवी कटरा, बनिहाल या ठिकणी ही गाडी थांबे घेईल .
दिल्ली ते काश्मीर ट्रेन प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ही गाडी थेट श्रीनगर जाणार नाही तर कटरा ते श्रीनगरसाठी वेगळी ट्रेन असेल. तर ही ट्रेन नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाईल. कटरा येथे प्रवाशांना दुसऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये बसावे लागेल, जी श्रीनगरपर्यंत जाईल.
पर्यटनाला चालना
- काश्मीरला जोडणारा सर्वात जलद रेल्वे मार्ग
- सहलींसाठी उत्तम पर्याय – सुंदर निसर्गरम्य प्रवास
- वैष्णो देवी यात्रेकरूंना अधिक सोयीस्कर प्रवास