काय सांगता ! 11 मार्गांवर ‘वंदे भारत’ तोट्यात ? निम्म्या जागा भरताना सुद्धा नाकी नऊ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ म्हणजे मोदी सरकारचा महत्तवाकांक्षी प्रकल्प. खूप आरामदायी आणि विमानांप्रमाणे प्रिमिअम गाडीला प्रवाशांनी उचलून धरले. मात्र देशातील या लक्झरी रेल्वे बाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक मार्गांवर एका मागोमाग एक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मात्र या व्हीआयपी ट्रेनला काही मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र काही मार्गावर आहे त्या सीट्स सुद्धा भरता येत नाहीत अशी स्थिती आहे.

ट्रेनचं भाडं सामान्यांना न प्रवडणारं

संपूर्ण देशाचा विचार करता जवळपास 66 मार्गावर प्रीमियम ट्रेन सुरू करण्यात आले आहेत परंतु या ट्रेनचा भाडंच एवढं आहे की ही ट्रेन सर्वांना परवडणारी नाही. त्यामुळेच काही मार्ग हे तोट्यात चालले आहेत.

रेल दुनिया या वेबसाईटवर याबाबतचे माहिती सांगण्यात आली आहे. देशभरातील काही भागांमध्ये वंदे भारताला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर भुवनेश्वर विशाखापट्टणम, टाटानगर- ब्रह्मपूर, रीवा- भोपाळ, कलबुर्गी- बंगळुरू,उदयपूर- आग्रा/ जयपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, नागपूर- सिकंदराबाद आदि मार्गावर निम्म्यापेक्षा जास्त सीट हा रिकाम्या राहू लागल्याची माहिती आहे. या ट्रेनची सेवा ही विमानासारखी प्रीमियम सेवा आहे. अगदी पुणे मुंबई असा वंदे भारतचा प्रवास करायचा विचार केल्यास तिकीट उपलब्ध असतात. या मार्गावरील वंदे भारत ट्रेन लोकांच्या सोयीची आहे. बहुतांश वेळा प्रवाशांनी ही ट्रेन भरलेली असते.

11 मार्गांवर प्रवासीच नाहीत

मात्र 11 मार्ग असे आहेत जिथे प्रवासी मिळत नाहीत. यामध्ये नागपूर ते सिकंदराबाद ट्रेनमध्ये एकूण 1328 सीट्स उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी बहुतांश वेळा सरासरी1118 या रिकाम्याच असतात. तर दुसरीकडे भुवनेश्वर विशाखापट्टणमची ट्रेन 1076 पैकी 934 जागा रिकाम्या ठेवून धावत असते. अशीच परिस्थिती इतर काही ट्रेन्स ची सुद्धा आहे. या ट्रेनला निम्म्या जागाही भरताना नाकी नऊ येत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन तिकीट दर कमी करणार की तोटा सहन करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.