लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Vande Bharat Train : आता लवकरच मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत सेमी हायस्पीड एक्स्प्रेस धावणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांच्याकडून महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली.

Distance between Mumbai-Goa to come down as Railways soon to start Vande  Bharat train on this route | Zee Business

याबाबत बोलताना डावखरे म्हणाले कि,” आमदारांच्या शिष्टमंडळाने दानवे यांची नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी झालेल्या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले की,” आता लवकरच मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या गाड्यांच्या धर्तीवर मुंबई ते गोवा दरम्यान एक्सप्रेस चालवली जाईल.” मुंबई-गोवा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून पाहणीनंतर नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यात येईल, असेही केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी या शिष्टमंडळाला सांगितले. या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने ठाणे आणि कोकण विभागातील रेल्वेच्या अनेक मुद्द्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी बराच वेळ चर्चा केली. Vande Bharat Train

Vande Bharat train soon on Mumbai-Goa route: Union minister to Maha  legislators | Mumbai news - Hindustan Times

रेल्वे प्रकल्पामुळे बाधित व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाइकांना स्टॉलचे वाटप, प्रत्येक रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी मोबाईल स्टॉल्स, त्यांच्या आणि गाड्यांमधील अंतर कमी करण्यासाठी फलाटांची उंची वाढवणे, रायगडमधील महाड येथे रेल्वे पूल बांधणे, पूर टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासारख्या मुद्द्यांवरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. Vande Bharat Train

Good news for employees! Mumbai-Goa Vande Bharat train will start!

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) योजनेंतर्गत रेल्वे रुळांवर राहणाऱ्यांचे पुनर्वसन, सावंतवाडी-दिवा रेल्वे सेवेचा दादरपर्यंत विस्तार आणि इतर मुद्द्यांवरही दानवे यांच्याशी शिष्टमंडळाकडून चर्चा करण्यात आली. यावेळी ठाण्यातील मुंब्रा स्थानकाचे नाव बदलून मुंब्रा देवी स्थानक करावे, अशी मागणी देखील आमदारांनी केली आहे. राज्य सरकारने प्रस्ताव मांडल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दानवे यांनी यावेळी बोलताना दिले. Vande Bharat Train

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/

हे पण वाचा :
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???
Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!
Income Tax Notice : जर आपण करताय ‘हे’ 5 प्रकारचे ट्रान्सझॅक्शन तर आयकर विभागाकडून मिळू शकेल नोटीस