हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली Yes Bank मधील घोटाळ्याच्या बातम्यांमुळे ही बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. अशा संकटाच्या वेळी कारवाई करत आरबीआयकडून येस बँकेचे जुने बोर्ड बरखास्त करून ते आपल्या ताब्यात घेण्यात आले. ज्यानंतर गुंतवणूकदारांचे काही शेअर्स डिमॅट खात्यातून अचानकपणे गायब झाले. प्रत्यक्षात हे शेअर्स लॉक इन पीरियडमध्ये गेले होते. आता 6 मार्च रोजी हा लॉक-इन कालावधी संपणार आहे. अशातच आता येस बँकेतील सर्वात मोठी शेअरहोल्डर असलेल्या SBI कडून आपली हिस्सेदारी कमी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
हे जाणून घ्या कि, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने यावेळी Yes Bank ला आर्थिक संकटातून वाचवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी RBI ने उचललेल्या पाउलांनंतर एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने भांडवल टाकून येस बँकेला बुडण्यापासून वाचवले होते.
SBI कमी करणार हिस्सा
आता अशी माहिती समोर आली आहे की SBI आता Yes Bank तील आपला हिस्सा कमी करू शकते. कारण एसबीआयचा येस बँकेतील लॉक-इन कालावधी 6 मार्च 2023 रोजी संपणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्स मधील बातमीनुसार, एसबीआय येस बँकेतील आपली हिस्सेदारी कायमस्वरूपी कायम ठेवण्याच्या बाजूने नाही. ज्यामुळे ते आपली हिस्सेदारी कमी करण्याबाबत विचार करत आहे. मात्र, यासाठी एसबीआयला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
Yes Bank चे एमडी आणि सीईओ प्रशांत कुमार यांनी याबाबत ET ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी एसबीआयच्या वतीने बोलू शकत नाही, मात्र नुकत्याच आलेल्या बातम्यांबाबत आत्ताच काळजी करण्यासारखे काही नाही.” हे लक्षात घ्या कि, 2020 मध्ये येस बँकेबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी एसबीआयने या बँकेतील 49 टक्के हिस्सा ताब्यात घेतला होता.”
31 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयकडे आता येस बँकेतील 26.14 टक्के हिस्सा आहे. मात्र Yes Bank च्या बेलआउट प्लॅनिंगनुसार, भांडवल गुंतवल्याच्या तारखेनंतर 3 वर्षांपर्यंत SBI आपला हिस्सा 26 टक्क्यांपेक्षा कमी करू शकणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/get-quotes/equity?symbol=YESBANK
हे पण वाचा :
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल
PM Kisan Yojana चे पैसे मिळाले नसल्यास ‘या’ नंबरवर करा कॉल !!!
अभिनेता Arshad Warsi वर सेबीची कडक कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
LIC च्या ‘या’ 3 पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून चांगल्या नफ्याबरोबर मिळवा कर सवलत !!!
Business Idea : आठवड्यात 1 सौदा झाला तरी थेट 30 हजार खिशात, ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा हजारो रुपये