Vande Metro : गुजरातला मिळणार देशातील पहिली Vande Metro; मोदी दाखवणार हिरवा झेंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन (Vande Metro) गुजरातला राज्याला मिळाली आहे. ही ट्रेन अहमदाबाद आणि भुज या दोन शहरादरम्यान धावेल. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या पहिल्यावहिल्या वंदे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनमुळे गुजरात मधील नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. या वंदे मेट्रोचे टाईमटेबल आणि तिकीट दर सुद्धा समोर आले आहेत. चला तर मग याबाबत सर्वकाही सविस्तर जाणून घेऊयात…

कस आहे वेळापत्रक? Vande Metro

अहमदाबाद आणि भुज या शहरांदरम्यान धावणारी वंदे मेट्रो (Vande Metro) आठवड्यातून सहा दिवस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. हि वंदे मेट्रो भुज येथून पहाटे 5:05 वाजता सुटेल आणि अहमदाबादला सकाळी 10:50 वाजता पोहोचेल आणि रिटर्न प्रवासात ही ट्रेन अहमदाबादहून संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि रात्री 11:10 वाजता आपल्या पुन्हा भुजला पोहोचेल. 5 तास 45 मिनिटांत या दोन्ही शहरामधील अंतर कापले जाईल. अहमदाबाद ते भुज वंदे मेट्रो अंजार, गांधीराम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमती या मध्यवर्ती स्थानकांवर 2 मिनिटे थांबेल.

तिकीट दर किती –

वंदे मेट्रो ट्रेनचे तिकीट किती असेल हे सुद्धा समोर आलं आहे. यामध्ये किमान भाडे 30 रुपये असेल. यावर जीएसटीही भरावा लागेल. यामध्ये तुम्ही 50 किलोमीटरचा प्रवास केल्यास तुम्हाला 60 रुपये अधिक GST आणि इतर लागू शुल्क भरावे लागतील. म्हणजेच प्रति किलोमीटर किमान 1.20 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. ही नवीन वंदे मेट्रो ट्रेन गुजरात राज्यातील पहिली मेट्रो सेवा असेल, जी दोन मोठ्या शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी वरदान ठरेल. या वंदे मेट्रो ट्रेन मुळे भारतीय रेल्वेचे जाळे आणखी विस्तारेल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव सुद्धा घेता येईल.