Vande Metro । मागील काही वर्षांत भारतीय रेल्वे विभागाचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा नवनवीन आणि अत्याधुनिक रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत आल्याने रेल्वे प्रवास अतिशय सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. त्यांतच आता देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन धावणार असून या रेल्वेचे यशस्वी टेस्टिंग पार पडलं आहे. मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्त (CCRS) यांनी ICF, RDSO आणि दक्षिण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह वंदे मेट्रो रेकचा स्पीड ट्रायल विल्लिवाक्कम आणि वालाजाह दरम्यान केला. यावेळी या रेल्वेचं स्पीड 130 किलोमीटर प्रतितास इतकं होते.
वंदे मेट्रोमध्ये 12 AC कोच- Vande Metro
जनक कुमार गर्ग, CCRS यांनी Vande Metro ट्रेनच्या पहिल्या रेकची पाहणी करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ला भेट दिली. ICF मध्ये तयार करण्यात आलेल्या या वंदे मेट्रो ट्रेन मध्ये 12 AC कोच आहेत. हि ट्रेन खास करून 150-200 किमी अंतराच्या दरम्यान प्रवास करण्यासाठी बनवण्यात आली असून ताशी 110 किमी प्रतितास वेगाने धावू शकते असं म्हंटल जातंय. कमी अंतर असलेल्या कोणत्या २ मुख्य शहरादरम्यान प्रवास करण्यासाठी वंदे मेट्रो ट्रेन अतिशय उपयुक्त ठरू शकते. विल्लिवाक्कम आणि वालाजाह दरम्यान जरी या वंदे मेट्रोचे टेस्टिंग झालं असलं तरी याच २ स्टेशनवर हि ट्रेन धावेल कि अन्य कोणत्या मार्गावर धावेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
CCRS ने ICF आणि ICF चे महाव्यवस्थापक यू.सुब्बा राव यांच्याशीही वंदे मेट्रो ट्रेनमधील तांत्रिक वैशिष्ट्ये आणि सुधारित प्रवासी सुविधांबद्दल चर्चा केली. वंदे मेट्रोमध्ये शहरवासीयांच्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारतप्रमाणेच वंदे मेट्रोचे ( Vande Metro) दरवाजे आपोआप उघडतील. या ट्रेनमध्ये प्रवाशांना इतर गाड्यांपेक्षा जास्त सुविधा मिळणार आहेत.वंदे मेट्रो ट्रेनमध्ये वंदे भारत ट्रेनप्रमाणेच सुविधा असतील. त्याची वैशिष्ट्ये देखील वंदे भारत ट्रेन सारखी असतील. मात्र, त्यात पॅन्ट्री असणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे मेट्रो ट्रेन मध्ये एका डब्यात सुमारे 100 प्रवाशांना बसण्याची सोय असेल. याशिवाय 200 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील. वंदे भारत मेट्रो ट्रेनची चाचणी पुढील काही दिवस अशीच सुरू राहणार आहे. येत्या 15 ऑगस्टपूर्वी देशातील हि पहिली वंदे मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.