Varandha Ghat Closed : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा ‘हा’ घाट वाहतुकीसाठी बंद

Varandha Ghat Closed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Varandha Ghat Closed । राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर काही भागात भूस्सखलन असून नागरिकांना धोका आहे. या एकूण सर्व परिस्थतीत प्रवास करणं अत्यंत धोकादायक मानलं जातंय. याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा वरंध घाट पावसाळा संपेपर्यंत म्हणजेच पुढील तीन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या तरी फक्त अवजड वाहतुकीसाठीच हि बंदी असणार आहे.

पावसामुळे दरड कोसळते – Varandha Ghat Closed

वरंध घाट हा निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील हिरवीगार झाडे, धबधबे, धुके आणि खोल दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. परंतु हा घाट पर्यटकांसाठी तेवढाच धोकादायक सुद्धा आहे. पुणे-महाड मार्गावरील हा घाट 5 किमी लांबीचा घाट आहे. मात्र पावसाळ्यात खड्डेमय आणि निसरडा होतो. जोरदार पाऊस आणि धुके यामुळे दृश्यमानता कमी होते, आणि रस्त्याच्या बाजूला खोल दऱ्या आहेत . रस्त्याची देखभाल कमी असल्याने हा घाट वाहनचालकांसाठी आव्हानात्मक ठरतो. हा घाट वळणदार आहे, त्यातच पावसामुळे दरड कोसळले, झाडे पडणे अशा गोष्टी याठिकाणी नित्याच्याच झाल्यात. घाटाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे तर प्रवास करणं म्हणजे मोठ्या जिकिरीचे काम आहे, हाच धोका ओळखून प्रशासनाने वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा (Varandha Ghat Closed) निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा : पावसाळ्यात महाराष्ट्रातील 5 खतरनाक घाट; प्रवास करताना सावधगिरी बाळगा

जिल्ह्याधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशानुसार, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा हा घाट फक्त अवजड वाहनांसाठी बंद राहील असे नाही तर हवामान खात्याचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी झाल्यास हलक्या वाहनांची वाहतूकही रोखण्यात येणार (Varandha Ghat Closed) आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील तीन महिन्यांसाठी घाट बंद करण्यात आला आहे. अशावेळी गरज पडल्यास नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

वरंध घाटाची वैशिष्ट्ये:

१) वरंध घाट हा निसर्गप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

२) पावसाळ्यात येथील हिरवीगार झाडे, धबधबे, धुके आणि खोल दऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात.

३) घाटातून प्रवास करताना डोंगरांनी वेढलेली ३,००० फूट खोल दरी आणि धुक्याची शाल पांघरलेले दृश्य मनमोहक असते.

४) घाटातील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे वाघजाई माता मंदिर. या ठिकाणाहून खोल दरी आणि धबधब्यांची अप्रतिम दृश्ये दिसतात.

५) घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, घनदाट जंगलात समर्थ रामदास स्वामींची शिवथरघळ आहे.