भारतीय रेल्वेने शेअर केला महिला ‘कुली’चा फोटो, वरुण धवन असा झाला रिऍक्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय महिला दिन 2020 अवघ्या काही दिवसांवर (८मार्च) आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाने ‘महिला कुली’ बद्दल एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काही महिला महिला कुलींचे फोटो शेअर केले असून यावर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने दिलेली रिएक्‍शन सध्या ट्विटरवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाद्वारे केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी ३ महिला कुलींचे फोटो शेअर करत लिहले आहे, “भारतीय रेल्वेसाठी काम करत असताना या महिला कुलींनी हे सिद्ध केले आहे की त्या कुणापेक्षा कमी नाहीत !!” आम्ही त्यांना सलाम करतो”.

ट्विटरवर बरेच लोक महिला कुलींचे कौतुक करीत असताना बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांनीही त्याच्या ट्विटमध्ये त्यांचे कौतुक केले आहे. आपल्या ट्विटमध्ये वरुणने लिहिले आहे, “ये है कुली नंबर वन”. वास्तविक, वरुण धवन लवकरच ‘कुली नं. 1’ या चित्रपटात दिसणार आहे आणि त्याने या चित्रपटाच्या नावाचा उल्लेख करत या महिला कुलींचे कौतुक केले आहे.

महत्त्वाची बाबा म्हणजे रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या महिला ‘कुली’च्या फोटोला आतापर्यंत ५ हजारांहून अधिक लोकांनी पसंती नोंदवली आहे. तर ९०० हून अधिक वेळा या ट्विटला रिट्वीट केले गेले आहे. सोबतच अभिनेता वरुण धवनने दिलेल्या रिएक्‍शनच्या ट्विटला ६हजाराहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment