वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी; शिंदे गटाचा दणका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला अजून एक धक्का दिला आहे. ठाकरे घराण्याचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वरुण सरदेसाई यांच्या हकालपट्टी नंतर ठाकरे – शिंदे वाद अजून विकोपाला जाण्याची शक्यता आहे. वरुण सरदेसाई यांचा आपल्या कामामध्ये हस्तक्षेप वाढल्याचा आरोप यापूर्वीच बंडखोर आमदारांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांची राज्य सचिवपदावरून थेट हकालपट्टी करण्यात आली असून वरुण सरदेसाई यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, कालच शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करून नवी कार्यकारणी स्थापन केली होती. त्यात उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेले रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती केली होती. तसेच आपल्यासोबत शिवसेनेचे 18 खासदार आहेत असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला होता.

Leave a Comment