औरंगाबाद| केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 18 ते 44 वयोगटाला 1 मे रोजी लसीकरण देणार अशी घोषणा केली होती त्याच अनुषंगाने आज शहरात आज 18 ते 44 वयोगटाला लसीकरण आस सुरुवात झाली
शहरातील मुकुंदवाडी, केसर कॉलनी आणि शादत नगर या तीन आरोग्य केंद्रावर तब्बेत 300 जणांना लसीकरण करण्यात आले. राज्य शासनाकडून या लसीकरणासाठी 3700 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी दिली
या लसीकरणासाठी प्रथमतः 18 ते 44 वयोगटातील सर्वांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असेल. ऑनलाईन नोंदणी नंतर अपॉइंटमेंट घेऊन मगच लसीकरण करता येईल