देवदूतच ः पैशासाठी नव्हे… कोरोनाने भयभीत रूग्णांची सेवा करणारे डाॅ. सुलतान अन्सारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

घरात पॅरालिस झालेली वयस्कर आईसह सहा महिन्याची लहान मुलगी असताना. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना, पैशासाठी नव्हे तर कोरोनाने भयभीत झालेल्या गोरगरिब रुग्णांची गैरसोय होऊ नये. यासाठी रुग्णाची सेवा करणारे सुलतान अन्सारी हे डॉक्टर नव्हे देवदूतच म्हणावे लागतील.

कराड शहरापासून जवळच असणारा वारुंजी या गावात डॉ. सुलतान अन्सारी हे गेले दहा वर्षांपासून आपले क्लिनिक चालवत आहे. दहा बाय दहाच्या एका रूममध्ये असणाऱ्या क्लिनिकमध्ये गेल्या वर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटापासून रुग्णांची चढत्या क्रमाने रांग लागते आहे.
एक किलोमीटर अंतरावरील कराड शहरात शेकडो डॉक्टर असताना. या ठिकाणी चारचाकी गाड्यांमधून गावातून रुग्ण उपचार करून घेत आहे. त्याला कारण गेल्या वर्षीच्या लाकडाऊनमध्ये कोरोनाच्या भीतीने सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केले होते. तेव्हा सुलतान अन्सारी यांचा दवाखाना रुग्णांसाठी अखंडित सुरू होता. किरकोळ आजारांसाठी शहरातील डॉक्टरांच्याकडे उपचारासाठी गेल्यानंतर लांबूनच तपासणी होत होती. अनेक टेस्टमधून नागरिकांना जावं लागत होतं, अनेकांनी आपले दवाखानेच बंद केले अशा परिस्थितीत डॉ. अन्सारी हे लोकांना देवदुता सारखे वाटत होते.

किरकोळ दुखणे अंगावर काढल्याने अनेकांना कोरोनासह मोठ्या आजारांना सामोरे जावे लागत होते. औषध गोळ्या सलाईन यासह अनेक उपचार करून दवाखान्यात आलेल्या पेशंटला डॉक्टर अन्सारी बरे करत होते. त्यामुळे दिवसेंदिवस पंचक्रोशीत त्यांच्या नावाचा बोलावला झाला. दररोज सकाळी 9 ते 2 सायंकाळी 5 ते रात्री 11 पर्यत काम करतात. सरासरी दीडशे पेशंट डॉक्टर अन्सारी तपासतात वर्षभरात 45 ते 50 हजार रुग्ण त्यांनी तपासले आहेत. केवळ 30 रूपयांत पेशंटला डाॅ. अन्सारी तपासणी करत असतात.

कोरोना काळात सर्व हॉस्पिटल, दवाखाने बंद असताना डॉ. अन्सारी करत असलेल्या रुग्णसेवेची ग्रामस्थांनी दखल घेऊन त्यांचा सत्कार करून सन्मानही केला आहे. शासन दरबारी ही वांरुजी व आसपासच्या गावातील कोरोनाबाधितांची संख्याही नगण्य आहे.

सहा महिने मुलगी, आईपासून लांब ः डाॅ. सुलतान अन्सारी

लोकांना लॉकडाऊनच्या काळात प्राथमिक उपचार मिळावेत, यासाठी करत असून कोरोनाची लक्षणे असलेल्या पेशंटला सर्व काळजी घ्यायला लावत आहे. पेशंटला प्राथमिक उपचार देऊन बरा करण्याचा प्रयत्न करतो, हे करताना माझ्या घरी सहा महिन्याची मुलगी आहे. पॅरालिस झालेली आई आहे. तिला दररोज इंजेक्शन द्यावे लागते, उचलावे लागते. मात्र कोरोनामुळे मी गेली सहा महिने त्याच्यापासून लांब आहे. कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करता यावी, दवाखाना चालू राहावा यासाठी करत असलयाचे सांगत असताना डॉ. अन्सारी यांचा कंठ दाटुन आला.

You might also like