हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांनी आपल्या कामकाजाचा जोर वाढवला आहे. यंदाच्या निवडणुकीत वेगवेगळे पक्ष नवे चेहरे उमेदवार म्हणून जाहीर करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, आता कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन (Veerappan) याची मुलगी ही निवडणुकीच्या मैदानात सुधारणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबतची माहिती स्वतः वीरप्पनची मुलगी विद्या राणी हिने दिली आहे. विद्या राणी (Vidhya Veerappan) ही तामिळनाडूच्या कृष्णागिरी लोकसभा मतदारसंघातून उभी राहणार आहे.
माध्यमांशी बोलताना विद्या राणी हिने म्हणले आहे की, “आपल्या वडिलांप्रमाणे मी सुद्धा जनसेवा करु इच्छिते. फक्त वडिलांची पद्धत ही योग्य नव्हती” सर्वात प्रथम विद्याराणी हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु काही दिवसांपूर्वीच तिने भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत नाम तमिलर काची (NTK) पक्षामध्ये प्रवेश केला. यानंतरच तिला कृष्णागिरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आले आहे. या भागामध्ये विद्याराणी एक शाळा चालवत असून सामाजिक कार्यामुळे ती येथील लोकांशी ही जोडली गेली आहे. त्यामुळे या भागातूनच तिला चांगला पाठिंबा देण्यात मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन यांची मुलगी विद्याराणी आहे. ती आपल्या वडिलांना आयुष्यात एकदाच भेटली होती. आपल्या वडिलांबरोबरची तिची ही भेट तिच्या आजोबांच्या घरी झाली होती. यानंतर ती कधीही आपल्या वडिलांना भेटू शकली नाही. सध्याच्या घडीला विद्याराणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. तिला आरएसएस आणि वनवासी कल्याण आश्रमाने दत्तक घेतले होते. तिथेच तीचे शिक्षण झाले. विद्याराणी व्यवसायाने वकील असली तरी तिला राजकिय क्षेत्रामध्ये अधिक रस आहे. त्यामुळेच आता ती लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे.