हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या श्रावण महिना सुरु असून जवळपास अनेकजण नॉन व्हेज खात नाहीत, त्याउलट सर्वत शुद्ध शाकाहारीचा थाट (Veg Thali Price) पाहायला मिळतो. अनेक शाकाहारी हॉटेलमध्ये श्रावण महिन्यात तोबा गर्दी पाहायला मिळते. मात्र तुम्हीही शुद्ध शाकाहारी असाल तर तुमच्यासाठी आम्ही महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत. जुलै 2024 मध्ये घरगुती शिजवलेल्या शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किंमती महिन्या-दर-महिन्यानुसार अनुक्रमे 11 टक्के आणि 6 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
काय आहे कारण? Veg Thali Price
रोटी राईस रेट नावाची वेबसाईट, रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, शाकाहारी थाळीच्या किमतीत झालेल्या 11 टक्के वाढीपैकी 7 टक्के वाढ केवळ टोमॅटोच्या किमतीमुळे झाली आहे. कारण टोमॅटोच्या किमती जुलैमध्ये 55 टक्क्यांनी वाढून 42 रुपये प्रति किलोवरून थेट 66 रुपये प्रति किलो झाली. टोमॅटो हा जेवण बनवताना वापरावाच लागतो, त्यामुळे त्याचा फटका शाकाहारी थाळीला बसला आणि थाळीच्या किमती वाढल्या. क्रिसिलच्या म्हणण्यानुसार, टोमॅटो शिवाय कांदा आणि बटाट्याच्या किमतीत सुद्धा अनुक्रमे 20 टक्के आणि 16 टक्क्यांनी वाढ झाली. कमी रब्बी उत्पादनामुळे कांद्याच्या किमतीवर परिणाम झाला, तर पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उशिरा झालेल्या ब्लाइटच्या संसर्गामुळे बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम झाला असं या अहवालात म्हंटल आहे. त्यामुळेच शाकाहारी थाळी महागली.
मांसाहारी थाळी स्वस्त कि महाग?
दुसरीकडे, मांसाहारी थाळीच्या किमती व्हेज थाळीच्या (Veg Thali Price) तुलनेत कमी वेगाने वाढल्या, कारण ब्रॉयलरच्या किमती स्थिर राहिल्यात. अहवालानुसार, जून महिन्यात मांसाहारी थाळीची किंमत ५८ रुपये होती मात्र ती जूनमध्ये ६ टक्क्यांनी वाढून ६१ वर पोचली. मात्र याचे कारणही नॉन व्हेज चा कोणता पदार्थ नसून टोमॅटोच्या वाढत्या किमती हेच आहे. महिन्याची तुलना केली तर जून पेक्षा जुलै महिन्यात मांसाहार थाळी महाग झाली आहे मात्र वर्षभराची तुलना केली तर मागच्या वर्षीपेक्षा यंदा नॉन व्हेज थाळी स्वस्तच झाली आहे. जुलै २०२३ मध्ये मांसाहारी थाळीची किंमत ६७ रुपये होती, मात्र यंदा हीच किंमत ६१ रुपये झाली आहे.