हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vegan Diet) निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही चांगल्या सवयी महत्वाच्या ठरतात. जसे की, नियमित व्यायाम करणे, सकस आणि संतुलित आहार घेणे, आवश्यक तितके पाणी पिणे. कोरोना महामारीनंतर लोक फिटनेसबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही काळात व्हीगन डाएटचे मोठे क्रेझ निर्माण झाले आहे. बरेच सेलिब्रिटी कलाकार, क्रिकेटपटू आणि अनेक दिग्गज मंडळी या डाएटला फॉलो करतात. शिवाय तरुण वर्गातील बरेच लोक या डाएटचे फॅन आहेत. अशा या डाएटविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. व्हीगन डाएट नेमका काय प्रकार आहे आणि त्याचे फायदे काय? चला जाणून घेऊया.
व्हीगन डाएट म्हणजे काय? (Vegan Diet)
शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार असतात. यांपैकी शाकाहारी लोक व्हीगन डाएट करत असल्याचे मानले जाते. मात्र, असे नसून व्हीगन डाएट ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. कारण व्हीगन डाएटमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस आणि मासे वर्ज्य आहेत. तसेच व्हीगन डाएटसाठी गाईचे किंवा म्हशीचे दूध नव्हे तर सोया मिल्कचे सेवन केले जाते.
एकंदरच व्हीगन डाएट (Vegan Diet) म्हणजे काय? तर वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे. प्राण्यांचे मांस, दूध आणि त्यापासून बनवले जाणारे पदार्थ व्हीगन डाएटमध्ये खाल्ले जात नाहीत आणि त्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. चला तर व्हीगन डाएटचे फायदे जाणून घेऊया
हाय ब्लड प्रेशरवर कंट्रोल
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्हीगन डाएटचे व्यवस्थित पालन केल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. परिणामी, रक्तदाबाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. (Vegan Diet) मधुमेह आणि किडनीच्या आजारांमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी व्हीगन डाएट वरदान ठरते.
कॅन्सरपासून संरक्षण (Vegan Diet)
व्हीगन डाएटमध्ये आपण जे पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात. या पदार्थांमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून आपले रक्षण होते.
वजनावर नियंत्रण
व्हीगन डाएट हा असा प्रकार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. (Vegan Diet) कारण, या डाएटमध्ये आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामध्ये चरबीचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी व्हीगन डाएट फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो.