भाजी मंडई बंद ः राजवाडा भाजी मंडईतील सात व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | राजवाडा येथील मंगळवार तळे मार्गावर असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईत सात भाजी विक्रेते कोरोना बाधित झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पालिकेने पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वच विक्रेत्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर मंडई सुरू केली जाणार आहे.

कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने सातारा पालिकेने उपाययोजनां वाढवल्या आहेत. शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, हातगाडीधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजवाडा चौपाटीवरील चार विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर खण आळीतील एका दुकानातही सात कर्मचारी बाधित आढळले. आता राजवाडा भाजी मंडईतील सात भाजी विक्रेत्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने विक्रेत्यांमध्ये व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तात्काळ भाजी मंडई बंद करण्याचे आदेश देऊन सर्वच भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जोपर्यंत येथील सर्व विक्रेत्यांची चाचणी होत नाही व त्यांचे अहवाल प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment