Vegetable Rate In Market | ‘या’ भाज्यांचे मार्केटमध्ये वाढले भाव, जाणून घ्या या आठवड्याचा भाज्यांचा दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vegetable Rate In Market | भाजी ही आपल्याला रोजच्या जेवणामध्ये लागतच असते. परंतु या भाज्यांचे दर बाजारामध्ये कमी आधिक होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी फायदा होतो, तर कधी तोटाही सहन करावा लागतो. आत्ताच सोमवारी संपूर्ण राज्यांमधून 641 वाहनांमधून भाजीपाला बाजार समितीमध्ये आला होता. यामध्ये तब्बल 4000 टन फळभाज्या होत्या. त्याचप्रमाणे 4 लाख 77 हजार या पालेभाज्यांच्या जुडी होत्या. आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे या भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल असा विचार करून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भाज्या मुंबईमध्ये पाठवल्या होत्या. परंतु या मालाची आवक जास्त वाढल्यामुळे बाजार भावात त्यांची किंमत देखील कमी झाली. तर काही भाज्यांची दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहेत.

उष्णता वाढताच झाली दरवाढ | Vegetable Rate In Market

मुंबई बाजार समितीमध्ये आणलेल्या या भाज्यांपैकी अनेक भाज्यांच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. यामध्ये आवळा, भेंडी, घेवडा, बीट, फरसबी, फ्लॉवर, गाजर, कैरी, कोबी शेवगा, टोमॅटो, कारली, तोंडली, वांगी, दोडका, वाटाणा यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे ज्यांचे दर कमी झालेले आहे.

परंतु या सगळ्या भाज्यांचे दर जरी कमी असले तरी या आठवड्यात ढोबळी मिरची, दुधी भोपळा, कोथिंबीर त्याचप्रमाणे मेथी या भाज्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. आता उन्हाची तीव्रता तशी वाढेल तशी बाजार वाढणार आहेत. असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. ( Vegetable Rate In Market)

आता आपण काही भाज्यांचे या आठवड्यातील दर जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी आपण पालेभाज्यांचे दर जाणून घेऊया

  • कांदा पात – 6 ते 8रुपये
  • कोथिंबीर – 10 ते 15रुपये
  • मेथी – 10 ते 15 रूपये
  • पालक – 6 ते 7 रुपये