Vegetables Farming In Summer | मार्च महिना सुरू झालेला आहे. शेतकरी त्यांच्या खरीप पिकाच्या हंगामाला सुरुवात करत आहे. या हंगामात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. मार्च ते एप्रिल हे महिने बागकामासाठी योग्य मानले जातात. या काळामध्ये शेतकरी भाजीपाला (Vegetables Farming In Summer)मोठ्या प्रमाणात पिकवतात आणि त्यांची चांगली कमाई देखील होती
तुम्हाला देखील मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणत्या भागांची लागवड करावी. जेणेकरून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल हे माहीत नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पाच भाज्यांची माहिती सांगणार आहोत. ज्या तुम्ही मार्च ते एप्रिल (Vegetables Farming In Summer)यादरम्यान केल्या तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल.
कोथिंबीर
कोथिंबीर ही एक प्रकारे औषधी आहे. जी सहसा भाज्यांना चवदार बनवण्याचे काम करते. कोथिंबीर वाढण्यासाठी 20 ते 30° c तापमान गरजेचे असते. अशा परिस्थितीत शेतकरी मार्च एप्रिल महिन्यात कोथिंबीरची लागवड करू शकतात.
कांदा
मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये कांदा प्रमुख पीक आहे. यासाठी 10 ते 32 अंश सेल्सिअस तापमान लागते. त्यामुळे तुम्ही जर या कालावधीत कांदा लावला तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. हा कांदा काढण्यासाठी 150 ते 160 दिवस लागतात.
भेंडी
भेंडी ही भाजी सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे तुम्ही या महिन्यात भेंडीची लागवड करू शकता. 25 ते 35 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी भेंडीची चांगली वाढ होते. त्यामुळे तुम्ही जर भेंडी लावली तर तुम्हाला चांगला फायदा होईल.
काकडी | Vegetables Farming In Summer
उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोक काकडी खातात. कारण काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यामध्ये बाजारात देखील काकडीला मागणी वाढते. त्यामुळे जर तुम्ही काकडीची लागवड केली तर तुम्हाला खूप चांगले उत्पन्न मिळू शकते.
वांगी
वांग्याचे पिकांना वाढण्यासाठी उष्ण ऋतूची आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही जर मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये वांग्याचे पीक घेतले. (Vegetables Farming In Summer) तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. त्याचप्रमाणे बाजारात देखील वांग्यांना या महिन्यात खूप चांगली मागणी असते.