Vegetables | अनेक शेतकरी हे आजकाल कमी कालावधीत येणारी पिके घेत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळतो. यामुळे अनेक शेतकरी आता भाजीपालाच्या पिकांची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे. भाजीपाला हा अत्यंत कमी कालावधीत येतो. आणि या भाजीपाल्यांना चांगला भाव देखील मिळतो. आर्थिक दृष्टिकोनातून हे शेतकऱ्यांचे फायद्याचे ठरते. आता जर तुम्ही या कालावधीत भाजीपाला लावण्याचे काही प्लॅन करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही भाजीपाल्यांची माहिती देणार आहोत.
भेंडी | Vegetables
भेंडी ही अनेक लोकांना आवडते. आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील शेतकऱ्यांसाठी भेंडीचे पैकी अत्यंत फायद्याचे पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये भेंडीची लागवड केली जाते. तुम्ही जर ऑगस्टमध्ये बहिणीची लागवड केली, तर नोव्हेंबरपर्यंत भेंडी परिपक्व होईल आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवता येईल.
कोबी
कोबीच्या लागवडीसाठी ऑगस्ट महिना खूप चांगला मानला जातो. रोपवाटिकेत देखील तुम्हाला याची रोपे मिळतील. कोबी हे पीक 70 ते 80 दिवसांमध्ये परिपक्व होते. कोबीला बाजारपेठेत जास्त मागणी असते. आणि त्यातून चांगली कमाई देखील होते.
पालक
पालकच्या लागवडीसाठी ऑगस्ट हा महिना चांगला आहे. लागवडीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसांमध्ये पालक पीक तयार होते. यातून चांगला नफा देखील मिळतो. त्यामुळे पालक हा एक लागवडीसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.
टोमॅटो
सध्या बाजारामध्ये टोमॅटोला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकरी देखील टोमॅटोची लागवड करताना दिसत आहे. तुम्ही जर सुरुवातीला टोमॅटोची लागवड केली तर 65 ते 70 दिवसांमध्ये टोमॅटोची तयार होतात.
ढोबळी मिरची
ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी ऑगस्ट हा महिना अत्यंत अनुकूल मानला जातो. यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीमध्ये रूपांची लागवड करता येऊ शकते. जवळपास 70 ते 80 दिवसानंतर ढोबळी मिरची काढणीस येथे बाजारपेठेत देखील ढोबळी मिरचीला चांगली मागणी असते.