औरंगाबाद : लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज आरटीओ कार्यालयाकडून वाहन परवाना चाचणी आणि पक्का वाहन परवाना चाचणीचे काम रद्द करण्यात आले होते. यावेळी कार्यालयात गर्दी करू नका अशा सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्या.
कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात दोन दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली होती. टाळेबंदी संपल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आरटीओ कार्यालयात गर्दी टाळण्यात यावी, ऑनलाइन पद्धतीच्या कामावर भर देण्यात यावा असे निर्देश देण्यात आले होते.
या निर्णयाची अंमलबजावणी करत आज आरटीओ कार्यालयात वाहन परवाना चाचणी आणि पक्का वाहन परवाण्याची चाचणीचे काम रद्द करण्यात आले होते. यावेळी कार्यालयात गर्दी करू नका आशा सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात येत होत्या.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group