आता पुण्यातील वेल्हे तालुका ‘राजगड’ नावाने ओळखला जाणार; मंत्रिमंडळाचा निर्णय

Rajgad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्याला “राजगड” (Rajgad) असे नाव दिले आहे. या वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणांसारखे अनेक महत्त्वाचे किल्ले स्थापित आहेत. तसेच या तालुक्यामधील राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार चालवला. त्यामुळे सरकारने या तालुक्याला राजगड असे नाव देण्याचे जाहीर केले आहे.

वेल्हे तालुका झाला राजगड

राज्य सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी तालुक्याचे नाव राजगड करण्यात यावे यासाठी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. तसेच, 22 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. 5 मे 2022 साली पुणे विभागीय आयुक्तांकडून तसा प्रस्ताव ही सादर करून घेण्यात आला होता. यानंतरच राज्य सरकारने वेल्हे तालुक्याला राजगड नाव देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता वेल्ह्याची नवीन ओळख राजगड अशी असणार आहे.

अहमदनगर झाले अहिल्यानगर

दरम्यान 27 एप्रिल 2023 रोजी वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यात यावे यासंदर्भात अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. अखेर आज सरकारने वेल्हे तालुक्याचे नाव राजगड म्हणून घोषित केले आहे. आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने, अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ते अहिल्यानगर असे केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरूनच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले आहे.