अखेर भेट झालीच! सोनू सूदच्या भेटीला पोहोचला हैद्राबादचा व्यंकटेश; पायी चालत कापले ७०० किमी अंतर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सोनू सूद सध्या कोरोनाच्या महाभयंकर काळात लोकांना मदत करताना दिसतोय. दरम्यान लोक त्याला देवासमान मानू लागली आहेत. या दरम्यान त्याचा एक जबरदस्त चाहता.. चाहता कमी भक्त जास्त असणारा एक युवक हैद्राबादहुन थेट मुंबईकडे पायी चालत निघाला होता आणि ते हि केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी. देवाला भेटण्यासाठी पायीच जायचं असत म्हणत या युवकाने ७०० किमी पायी चालत हैदराबादहून मुंबईपर्यंतचे अंतर कापले आणि अखेर त्याची भेट आपल्या देवाशी झालीच. सोनू सूदच्या भेटीनंतर या युवकाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. याला वेड म्हणावे का श्रद्धा ते ठाऊक नाही मात्र कृतज्ञता आजही माणसाच्या या विकृत जगात शिल्लक आहे हे पाहून आनंद वाटतो.

हा युवक मूळचा तेलंगणा मधील दोरनापल्ली या गावातील एक रहिवासी आहे. याचे नाव व्यंकटेश हरिजन असे आहे. व्यंकटेश हा इंटरमीडिएटसाठी अभ्यास करत आहे. तो केवळ सोनू सूदच्या भेटीसाठी १ जून २०२१ पासून दररोज सरासरी ४० किलोमीटर चालत अंतर पार करत होता. त्याने जवळजवळ ७०० किमी प्रवास पूर्ण करीत अखेर सोनूची भेट घेतली. मुख्य म्हणजे त्याच्या येण्याची खबर मिळताच सोनू सूद स्वतः त्याच्या स्वागतासाठी धावत गेटपर्यंत येऊन पोहोचला. त्याने अत्यंत आनंदाने आपल्या चाहत्याचे स्वागत करीत त्याची विचारपूस केली.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1403217952661331973

अभिनेता सोनू सूद आपल्या इतक्या मोठ्या चाहत्याला पाहून अत्यंत आनंदित झाला. त्याने व्यंकटेशची मनापासून विचारपूस केली आणि इतकेच नव्हे तर त्याच्या प्रेमासाठी त्याचे खूप आभार मानले. शेवटी व्यंकटेशची नेमकी काय अडचण आहे अशी विचारणा त्याने केली. यानंतर व्यंकटेशनेही आपली वेदना सोनूकडे व्यक्त केली. या दरम्यान सोनू सूदने सर्व चाहत्यांना हा संदेश दिला की, जीव धोक्यात घालून कोणीही असे पाऊल उचलू नये. पुढे सोनू सूदने व्यंकटेशला परत गाडीने हैदराबादला त्याच्या घरी सुखरूप पाठवले.

Leave a Comment