ऋषी कपूर यांच्या निधनानंतर राजकीय नेते हळहळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कालच अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे निधनाच्या धक्क्यातच असणाऱ्या चित्रपप्रेमींना आज दुसरा धक्का बसला आहे. सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचे कर्करोगाने आज मुंबईत निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर देशातील राजकीय वर्तुळातील नेत्यांनी सुद्धा दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. ऋषी कपूर हे प्रतिभेचे पॉवरहाउस होते अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या जाण्याने आपल्याला अतीव दु:ख झाल्याचे मोदी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्य्क्त केला आहे. ते करिष्मा असलेले अभिनेते होते. चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे, असे पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हा आठवडा भारतीय चित्रपटसृष्टीसाठी भयंकर असा आहे. ऋषी कपूर हे उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा ऋषी कपूर यांच्या निधनानंतर आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. ऋषी कपूर हे केवळ महान अभिनेतेच नव्हते, तर ते एक चांगला माणूसही होते, अशा शब्दात जावडेकर यांनी शोक व्यक्त केला.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. आम्ही विद्यार्थीदशेपासून ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहत मोठे झालो, ते अष्टपैलू अभिनेते होते, असे प्रसाद म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

 

Leave a Comment