Sunday, June 4, 2023

ज्येष्ठ अभिनेते सलीम गौस यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिग्गज भारतीय अभिनेते सलीम घौस यांचे आज 28 एप्रिल रोजी निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या पत्नीने याबाबतची माहिती दिली आहे.

बुधवारी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. ज्यानंतर त्यांना काल रात्री कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांचे निधन झाले. सलीम घौस यांनी फक्त हिंदी चित्रपटसृष्टीच नाही तर दक्षिणेकडील अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘कोयला’, ‘शपथ’, ‘अक्स’, ‘त्रिकाल’, ‘द्रोही’, ‘सारांश’ आणि ‘स्वर्ग नरक’ या चित्रपटांमध्ये देखील ते दिसले होते. वेल डन अब्बा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. सलीम घौस यांना आपल्या खलनायकी भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली.

सलीम घौस यांच्या पत्नीने सांगितले कि, ‘त्यांना कुणावर अवलंबून राहणे आवडत नसे. ते खूप स्वाभिमानी होते. ते एक प्रतिभावान अभिनेते तर होतेच मात्र त्याबरोबरच ते एक मार्शल आर्टिस्ट, दिग्दर्शक देखील होते. तसेच त्यांना स्वयंपाक करायला देखील आवडत असे.’