प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं वृद्धापकाळाने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं आज गुरुवारी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली. दुपारी २ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

बासू चॅटर्जी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी अजमेर येथे झाला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणारे बासू चॅटर्जी यांनी छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला आणि चमेली की शादी अशा सिनेमांचं दिग्दर्शनक केलं. ते असे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी कलकत्याची छाप स्वतःवर न पाडू देता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चमेली की शाकी आणि खट्टा मीठा हे सिनेमे त्याचंच एक उदाहरण आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रेम कथा साकारणं आणि फुलवणं यात बासु यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.

५० हून अधिक हिंदी आणि बंगाली सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या बासू यांनी रजनी आणि व्योमकेश बक्षी या मालिकांचंही दिग्दर्शन केलं. ७० च्या दशकात हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्यात सर्वोत्तम सिनेमे कोण तयार करतं याची निकोप स्पर्धा असायची. त्यांच्यातील या स्पर्धेमुळे प्रेक्षकांना फार चांगले सिनेमे पाहायला मिळाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment