VI 5g Network | वोडाफोन – आयडिया युजर्ससाठी आनंदवार्ता ! लवकरच घेता येणार 5 जी नेटवर्कचा आनंद

VI 5g Network
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

VI 5g Network | वोडाफोन आणि आयडिया ही आपल्या भारतातील सर्वात मोठी एक टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक ग्राहक आहेत. ही कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन नवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. आणि या प्लॅनचा त्यांच्या ग्राहकांना देखील मोठा फायदा होत असतो. जर आता तुम्ही देखील वोडाफोन, आयडियाचे युजर असाल आणि गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही कमी नेटवर्कमुळे त्रासले असेल. तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

कारण लवकरच वोडाफोन आयडिया केली कंपनी त्यांच्या युजरसाठी 5g नेटवर्क लॉन्च करणार आहे. येत्या काही महिन्यातच 5g सेवा ही ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. 5 g कंपन्यांच्या या यादी जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आघाडीवर आहेत. परंतु आता त्यानंतर आयडिया आणि वोडाफोनचे नाव देखील या जोडले जाणार आहे. त्यामुळे वोडाफोन आयडिया कंपनीचे हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आणि त्यांच्या ग्राहकांना देखील 5 g सेवा उपलब्ध होणार आहेत.

वोडाफोन आयडियाचे मुख्य कार्यकारी अक्षया मुद्रा यांनी कंपनीच्या तिसऱ्या तीमाहीकमाईच्या कॉल दरम्यान ही घोषणा केलेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार वोडाफोन आयडियाने आपल्या सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी काही नवीन उपाययोजना आणले आहेत. ज्यामध्ये 3 g सेवा महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मुंबई आणि कोलकत्ता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये बंद करणार आहेत. त्यामुळे कंपनी इतर शहरांमुळे देखील ही 3g सेवा बंद करेल आणि आर्थिक वर्ष 2025 पर्यंत 3g नेटवर पूर्णपणे बंद केले जाईल.

काही दिवसापूर्वी एअरटेल आणि रिलायन्स जिओने त्यांच्या 5g प्लॅनच्या किमती जाहीर करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे आता या तिन्ही कंपन्यांमध्ये 5g नेटवर्कची चांगली स्पर्धा होणार आहे. त्यामुळे आता या टेलिफोन कंपन्या कोणत्या किमती घेऊन येत आहेत हे पाहणे सगळ्यांसाठी महत्वाचे असेल.