Wednesday, February 1, 2023

नीति आयोगाचे उपाध्यक्ष म्हणाले -“आर्थिक वर्ष 22 मध्ये अर्थव्यवस्थेचा विकास दर 10.5 टक्के राहू शकेल”

- Advertisement -

नवी दिल्ली । नीति आयोगाचे (Niti Aayog) उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी गुरुवारी सांगितले की,”भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात (FY22) 10.5 टक्के किंवा त्याहून अधिक वाढीचा दर गाठेल अशी अपेक्षा आहे. PAFI India कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते म्हणाले की,” रिटेल क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर विशेष भर आहे.”

कुमार म्हणाले, “मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस दोन्हीसाठी India Purchasing Managers Index मध्ये गेल्या महिन्यात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 10.5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त राहील अशी मला अपेक्षा आहे.

- Advertisement -

मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये वेगाने वाढ
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-जून तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था विक्रमी 20.1% वाढली. कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या वर्षीच्या कमी बेस तसेच मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमधील तीव्र वाढीमुळे याचे योगदान होते.

इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटरकडे लोकांचा कल
एका प्रश्नाला उत्तर देताना कुमार म्हणाले की,”दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट होण्याचे कारण पारंपरिक दुचाकी ऐवजी इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरकडे लोकांचा कल असू शकतो.

RBI ने FY22 साठी GDP वाढीचा अंदाज 9.5 टक्के ठेवला आहे
अलीकडेच, RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या (MPC) बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की,”MPC च्या मागील बैठकीपेक्षा यावेळी भारताची स्थिती बरीच चांगली आहे. यामध्ये वाढ होत आहे आणि महागाई अपेक्षेपेक्षा चांगली आहे. आर्थिक धोरण समितीने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी GDP वाढीचा दर 9.5 टक्के ठेवला आहे.