हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र जल्लोशाने साजरी केली जाते. यंदाही हि जयंती सगळीकडे धुमधडाक्यात साजरी होणार आहे. आताच प्रदर्शित झालेल्या ‘छावा ‘ चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल शिवजयंती निमित्त आग्र्याच्या किल्ल्यावर उपस्थित राहणार आहे. तसेच या कार्यक्रमात अनेक मान्यवर आपली उपस्थिती लावणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती –
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आग्र्याच्या किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता विकी कौशल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचा आराखडा –
कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतगायनाने दीपप्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले जाणार आहे.
महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि नाट्यरूपांतर सादर केले जाणार आहेत.
शिव जन्माचा पाळणा आणि ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ गीताचं सादरीकरण होईल.
मर्दानी खेळांचे थरारक सादरीकरण कोल्हापूरच्या सब्यसाची गुरुकुलकडून होणार आहे.
सुप्रसिद्ध गायक नितीन सरकटे आणि उत्कर्ष शिंदे यांचे गायन होणार आहे.
यानंतर ‘अफझल खानाचा वध’ या प्रसंगाचं नाट्यरूपांतर सादर केलं जाणार आहे .
कार्यक्रमाच्या शेवटी महाराजांच्या जीवनावर आधारित दीपोत्सव व डिजिटल आतिषबाजी होईल.