एकदम झकास! आता WhatsApp Web वरुनही करता येणार ‘व्हिडिओ कॉल’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । WhatsAppच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स आता हळूहळू WhatsApp Web वरही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप वेबवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsApp beta युझर्सना सध्या WhatsApp Web मध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे.

आगामी काळात WhatsAppच्या सर्व वापरकर्त्यांसाठी WhatsApp वेबवरुन व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा देण्यात येईल. WhatsAppकडून सध्या काही मोजक्या लोकांना चाचणीसाठी हे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. WhatsApp वेबवरुन व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे काही स्क्रिनशॉट्स देखील व्हायरल झाले आहेत.’WhatsApp Web’मध्ये मोबाइल व्हर्जनमधील WhatsApp प्रमाणेच चॅटिंगच्या शिर्षस्थानी Voice आणि Video कॉलचा पर्याय देण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉल येताच तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनवर एक पॉपअप विंडो सुरू होते. यात कॉल उचलण्याचा आणि कट करण्याचा पर्याय असेल. WhatsApp Webवरील व्हिडिओ कॉलमध्येही मोबाइल प्रमाणेच ऑडिओ म्यूट आणि ऑफ करण्याचा पर्याय देण्यात येईल. विशेष म्हणजे WhatsApp Webमध्ये एखाद्याचा व्हिडिओ कॉल आल्यास तुम्हाला व्हिडिओ कॉल एका विंडोमध्ये सुरू ठेवून दुसऱ्या विंडोमध्ये चॅटिंग देखील करता येणार आहे. दरम्यान, ही नवी सुविधा सामन्यांसाठी केव्हा सुरू होईल याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment