Video : छ. उदयनराजेंनी ‘गन’ने फायर करत केला वाढदिवस साजरा

Udayanraj Birthday
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी फॅशन आयकॉन ऑफ सातारा 2023 च्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या फॅशन शो चा शुभारंभ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आणि सिने अभिनेता अनुप सिंह ठाकुर आणि सोनाली पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छ. उदयनराजे यांनी फायर गन ने कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

साताऱ्यात या कार्यक्रमासाठी दिनांक 14 फेब्रुवारी पासून ऑडिशन घेण्यात आली होती. मुले- मुली विवाहित महिला व पुरुष तसेच जोडपे यांचा या कार्यक्रमात समावेश होता. याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांचा सातारा विकास आघाडीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस येत्या 24 फेब्रुवारीला असून कार्यक्रमातील मान्यवर आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केक कापून त्यांचा दोन दिवस आधीच वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमास सातारकरांनी उपस्थिती लावली.

कराडला बैलगाडी शर्यतीचे आयोजन
छ. उदयनराजे भोसले यांच्य वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कराड व सातारा येथे सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व विजय यादव मित्र परिवार यांच्याकडून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.