Video:कोरोना होऊनही ”टेंशन घेऊ नको रे मित्रा!”म्हणणाऱ्या ‘त्या’ पोलिसाला रितेश देशमुखचा सलाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । एरवी सभा, मिरवणूक, उत्सवात ड्युटी बजावणारे पोलीस कोरोनाच्या जीवघेण्या संकटात सुद्धा रस्त्यावर ऑन ड्युटी २४ तास आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत असताना मुंबई पोलीस दलातील अनेक योद्ध्यांवरही कोरोनाने हल्ला केला आहे. मात्र अशा परिस्थितीतही त्यांची जिद्द मात्र कायम आहे. याची अनुभूती देणारा एक व्हिडीओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

मुंबई पोलीस दलातील एका २९ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच त्याला रुग्णालयात जाण्यासाठी एक रुग्णवाहिका आली. मात्र, रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी तो जे वाक्य बोलला ते मुंबई पोलिसांची जिद्द आणि त्यांच्या कणखरपणाचे दर्शन घडवणारे होते. हा पोलीस कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना रुग्णवाहिकेत बसण्यापूर्वी एकच वाक्य बोलला ते म्हणजे, “काही टेंशन घेऊ नको रे मित्रा”, या त्याच्या वाक्यानं कोरोनाच्या लढाईत मुंबई पोलिसांचे मनोधर्य आणखी वाढल्याचं मुंबई पोलिसांच्या ट्विटवरून कळते आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या या योद्ध्याचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या आमच्य २९ वर्षीय योद्ध्याने जे आम्ही सांगायचा प्रयत्न करत आहोत ते थोडक्यात सांगितलं आहे”.

हा व्हिडिओ आणि या पोलीस कर्मचाऱ्यांची जिद्द पाहून बॉलीवूडमधील मराठमोळा स्टार रितेश देशमुख सुद्धा भारावून गेला. रितेश देशमुखने हा व्हिडिओ रिट्विट करत मुंबई पोलिसांना कडक सलाम केला आहे. दरम्यान, करोनाविरोधातील लढाईत आरोग्य कर्मचारी आणि पोलीस सर्वात आघाडीवर राहून लढत आहेत. आतापर्यंत राज्यातील जवळपास १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये २० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात जास्त पोलीस मुंबईतील आहेत. तर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या लढाईत बलिदान दिल आहे. यानंतर पोलीस खात्याने आपल्या कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घेत ५५ हून जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचा आदेश दिला आहे. त्यांना पोलीस बंदोबस्तास न येण्यास सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

Leave a Comment