हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशावरील कोरोनाचं सावट दूर करण्यासाठी देशातील नागरिक आपली जबाबदारी ओळखून लॉकडाऊनमध्ये घरी बसून आहे. मात्र या साऱ्यामध्ये पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी त्यांच्या जीवाची बाजी लावून देशातील नागरिकांसाठी अहोरात्र काम करत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेक जण तुम्हाला घरात काही कमी पडू नये म्हणून रस्त्यावर आहेत. तर काही जण ज्यांना घरच नाही अशांच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करताना दिसत आहेत. त्यामुळे मराठी कलाकारांनी ‘तू चाल पुढं’ असं म्हणतं देशासाठी झटणाऱ्यांचे व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानत या सर्वांचे मनोबल वाढण्याचा प्रयन्त केला आहे. तू चाल पुढं’ या व्हिडीओच्या माध्यमातून मराठी कलाविश्वातील अनेक कालाकार एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे या गाण्यात मराठी कलाविश्वातील तब्बल ३२ कलाकार झळकल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीस दल, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवक, सफाई कामगार, सरकारी कर्मचारी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सुरक्षा रक्षक, शेतकरी, भाजी विक्रेते यांचे आभार मानले आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक कलाकारांनी ते शेअर केलं आहे.चला तर पाहुयात या व्हिडिओ कोण-कोण आहेत ते..
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”




