कोणीतरी आवरा याला ! दोन्ही हातात मोबाइल घेऊन चालवत होता बाईक; पोलीससुद्धा झाले हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वडोदरा या ठिकाणी एक अजब प्रकरण उघडकीस आले आहे. यामध्ये एक व्यक्ती बाईक चालवताना दोन मोबाइल फोन वापरत होता. तसेच या व्यक्तीने बाईक चालवताना हेल्मेटसुद्धा घातले नव्हते. दोन्ही हातात फोन घेऊन ही व्यक्ती बाईक चालवित होती. या बाइकस्वाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याला इ-चलान पाठवण्यात आले. त्याच्या या अनोख्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बाईक चालवताना दोन्ही हात सोडून वापरत होता मोबाइल…
वडोदरा पोलिसांनी ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाइकस्वराविरोधात इ-चलान जारी केले. या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यामध्ये हा बाईकस्वार दोन्ही हात सोडून फोनवर बोलत होता. यानंतर वडोदरा ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्यावर तातडीने कारवाई केली. भारतात कार वा दुचाकी चालवताना हेडफोन वापरण्याची परवानगी नाही. आणि भारतीय मोटर वाहन अधिनियमअंतर्गत ड्रायव्हिंग करताना फोनचा उपयोग करणे हा गुन्हा मानला जातो.

हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर…
हेल्मेटच्या आत इअरफोन लावणं गैरकायदेशीर आहे. जर तुम्ही हेल्मेटच्या आत स्मार्टफोन ठेवत असाल तर पोलीस तुमच्याकडून दंड आकारू शकतात. त्यामुळे बाईक किंवा कार चालवताना कानात इअरफोन घालणे हा कायद्याने गुन्हा आहे.

Leave a Comment