व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही मीडियामध्ये आली आहे. त्यात असे म्हटले आहे की,’एका दीड वर्षाच्या निरागस मुलाची आई प्लॅटफाॅर्मवर मृत अवस्थेत पडली होती. या निष्पाप मुलाला हे देखील माहित नव्हते की त्याची आई हयात नाही आणि ते मुल त्याच्या आईच्या अंगावर झाकलेल्या चादरीला पदर समझून खेळत होते. खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना पाठवलेल्या एका याचिकेत ३ जूनपर्यंत पक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

खंडपीठाने म्हटले आहे की,’आम्हांला हे जाणून घ्यायचे आहे, ती महिला खरोखरच अहमदाबादहून कटिहारकडे जात होती आणि ट्रेनमध्ये भूकबळीमुळे तिचा मृत्यू झाला ? या महिलेचे पोस्टमॉर्टम केले की नाही याबाबतची माहिती खंडपीठाने राज्य सरकारकडेही मागितली आहे. जर पोस्टमॉर्टम केले असेल तर तिच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते ? ती महिला आपल्या भावंडांसह ट्रेनमध्ये प्रवास करत होती ? जर हे सर्व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडले असेल तर ते अत्यंत चिंताजनक आहे, जे कोणत्याही परिस्थितीत कोर्ट याकडे दुर्लक्ष करणार नाही. पाटणा उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने वकील आशिष गिरी यांना यासंदर्भात सहकार्य करण्यास सांगितले आहे.

२५ मे रोजी कटीहार येथे राहणाऱ्या एका महिलेचा मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात मृत्यू झाला. ती लेबर ट्रेनने येत होती. ही मृत महिला आणि तिच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुरुवारी पाटणा उच्च न्यायालयानेही याबाबत स्वतःहून दखल घेतली आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.