हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शिवसेनेतील बंडखोर आमदारांचा (rebel mla) शिंदे गट व भाजपाने एकत्रित येत सरकार स्थापन केलं. आता विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील 11 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले सर्व बंडखोर आमदार (rebel mla) सुरत, गुवाहाटी व अखेर गोवा या मार्गे पुन्हा महाराष्ट्रात परतत आहेत. गोव्यातील हॉटेल ताजमधून गोव्याच्या विमानतळावर जातानाचा या आमदारांचा (rebel mla) एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक आमदार एकनाथ शिंदे यांना “साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी” असं म्हणताना दिसत आहे. या आमदाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
“साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी”; 'या' बंडखोर आमदाराचा व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/TIbsEGx8a4
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 3, 2022
हा व्हिडीओ गोव्याहून मुंबईला येणाऱ्या आमदारांच्या (rebel mla) बसमधील आहे. त्यात कोणकोणते आमदार येत आहेत हे दिसत आहे. यात एकनाथ शिंदेंपासून बच्चू कडूंपर्यंत अनेकांचा समावेश आहे. व्हिडीओत काही आमदार आनंदाने हातवारे करत आहेत, बोलत आहेत, तर काही आमदार शांतपणे बसमध्ये बसलेले दिसत आहे.
व्हिडीओच्या शेवटी मागाठणे मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार (rebel mla) प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदे यांना आपली एकनिष्ठा सांगत आहेत. यात ते “साहेब मुंबईत बॅनरवर तुमचा फोटो ठेवणारा पहिला माणूस मी” असं म्हणत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर (rebel mla) शिवसैनिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. अशा स्थितीतही मी तुमचा फोटो असणारा बॅनर मुंबईत लावल्याचं बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंना सांगत आहेत.
हे पण वाचा :
सत्ता गेली पण माज काही केल्या जात नाही…; गोपीचंद पडळकरांची घणाघाती टीका
अजून किती वर्षांपर्यंत राहणार भाजप युग?; अमित शाहांनी दिले ‘हे’ उत्तर
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार
देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात किती पक्षी मारले?
PNB ग्राहकांना खुशखबर!! FD वरील व्याजदरात वाढ