Saturday, March 25, 2023

‘त्या’ बलात्कार पीडितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारीत ; केले ‘हे’ मोठे विधान

- Advertisement -

औरंगाबाद प्रतिनिधी | बलात्कार संदर्भात मी माझे निवेदन न्यायालयातच सांगणार आहे. असा पीडितेचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारीत झाल्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आता पोलिसाकडे लवकरच जबाब नोंदविणार आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख यांच्याविरुद्ध 29 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात 26 डिसेंबर रोजी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईत शिक्षक म्हणून नोकरी लावण्याच्या आमिषाने जवळीक साधून कारमध्ये 14 नोव्हेंबर रोजी रात्री हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत आरोपी हा सत्ताधारी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे आरोपीला तातडीने अटक न करता गुन्ह्याचा तपास सुरू केला.

- Advertisement -

मेहबूब शेख यांनी याविषयी पत्रकार परिषद घेऊन तक्रारीत नमूद तारखेला ते औरंगाबाद शहरात नव्हते असे सांगून आपल्या विरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलेला ओळखत नसल्याचे म्हटले होते. असे असले तरी आरोपी महबूब शेख यांचा जबाब पोलिसाकडून नोंदविण्यात येणार आहे. याकरिता लवकरच पोलिसाकडून महबूब शेख यांना हजर राहण्यास संदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी बोलावणार याविषयी अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. दरम्यान बलात्कार पीडितेने बलात्कार संदर्भात मी माझे निवेदन आता न्यायालयातच सांगणार आहे असा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारित केला. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’