RPF जवानाच्या प्रसंगावधनाने गरोदर महिलेसह लहान मुलाचा वाचला जीव ( Video )

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ३ मे रोजी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर एक धक्कादायक घटना घडली आहे. एक गरोदर महिला आपल्या लहान मुलासह दादर स्टेशनवरून दानापूर ट्रेनमध्ये चढत असताना तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. त्यावेळी तिकडे ड्युटीवरील तैनात असलेले आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत पळत जाऊन गरोदर महिलेसह लहान मुलाचा जीव वाचविला आहे. हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत मध्य रेल्वेने ट्विटर हॅण्डलवरून या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

काही दिवसांपूर्वी वांगणी येथे रेल्वे स्टेशनवर अंध महिलेच्या मुलाचा स्वतःचा जीव धोक्यात घालून जीव वाचवणारा बहाद्दूर मयूर शेळकेप्रमाणे अशोक यादव यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या घटनेचा व्हिडिओ ट्विट करताना मध्य रेल्वेने प्रवाशांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करु नका, असा मोलाचा सल्लासुद्धा दिला आहे. हि घटना मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडली आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव शोभा कुमारी आहे, ती दादर वरून दानापूरला जात होती. मात्र तिला पोहोचायला उशीर झाला. तेवढ्यात गाडी सुरू झाल्याने तिने धावत जाऊन तिने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा तोल गेला आणि तिचा मुलगा खाली पडला. त्यावेळी तिकडे ड्युटीवरील तैनात असलेले आरपीएफ कर्मचारी अशोक यादव यांनी प्रसंगावधान दाखवत दोघांनाही रेल्वे खाली जाण्यापासून वाचवले. याबद्दल जवान यादव यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तसेच त्यांना लवकरच सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांनी चालू गाडीत चढू अथवा उतरू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment