VIDEO: गावकऱ्यांनो घरात राहा! करोनाबाबत आवाहन करताना महिला सरपंचांना अश्रू अनावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर 

राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शासन व्यवस्थेतील सर्व यंत्रणा दिवसरात्र कामाला लागल्या आहेत. लोकांना सहकार्याचं आवाहन करत आहेत. मात्र, अजूनही काही लोक या आवाहनाला प्रतिसाद देतांना दिसत नाही आहेत. असाच काहीसा प्रकार गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये पाहायला मिळत आहे. नोकरी निम्मिताने मुंबईत असलेले काही नागरिक लॉकडाऊनमुळे गावात परतले आहेत. त्यामुळं गावात परतलेल्या या लोंकाना खबरदारी म्हणून गावातच राहण्याची विनंती ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. मात्र, ते ऐकत नसताना गावच्या सरपंच जोत्स्ना पठाडे यांनी एका व्हिडिओद्वारे या सर्व मुंबईकर गावकऱ्यांना घरात राहण्याचे भावनिक आवाहन केलं आहे. परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत गावाच्या आरोग्यासाठी मुंबईत आलेल्यांनी कृपा करून घरी राहा असं म्हणतं असतांना त्यांना अश्रू अनावर झाले…
पाहुयात नेमकं काय म्हणाल्या गावच्या सरपंच..

गावकर्‍यांनो घरात रहा म्हणताना महिला संरपंचाला अश्रू अनावर

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment