कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरात एका महिलेने चार लहान मुलांच्या मदतीने चोरी केल्याचा व्हिडिअो व्हायरल होत आहे. शहरातील गुरूवार पेठेतील कोयना दूध शाॅपीतून चोरी झाली असून चोरी करतानाच सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. अलताफ युसुफ मुतवल्ली (रा. कराड, जि. सातारा) असे दुकान मालकांचे नांव आहे.
मिळालेली माहीती अशी, शहरातील मुख्य बाजारपेठेत गुरुवार पेठेत कोयना दूध शाॅपी हे दुकान आहे.
शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या टिळक पथ अर्बन बॅकेजवळ असणाऱ्या दुकानात ही चोरीची घटना घडली आहे. सोमवार दि. 12 जुलै रोजी दुपारी 12. 30 वाजण्याच्या सुमारास दुकानात एक महिला व चार लहान मुले आले होते. त्यांनी दुकादारांस अनेक वस्तू दाखविण्यास सांगितले, यावेळी दुकानदारांचे लक्ष विचलित करून त्यांच्या बॅगेतील रक्कम चोरून नेली आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/490817755339515
दुकान मालकांने शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांचा झालेल्या व्यवसायातील रक्कम बॅगेत भरून ठेवलेली होती. काही वेळाने बॅगेत पाहिले असता पैसे नसल्याचे दिसून आले. तेव्हा दुकानाजवळील सीसीटीव्ही पाहिले असता. एक महिला व तिच्या सोबत आलेल्या लहान चार मुलापैकी एक मुलगी पैसे बॅगेतुन पैसे घेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. तरी सर्व व्यापारी बंधुना विनती आहे, की आपण सर्तक व जागरूक राहुन संबधित हा परीवार आपणास दिसला आसता संबधीत व जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे ही विनती, दुकानमालक अलताफ मुतवल्ली यांनी केलेली आहे.