विधानपरिषदेचा निकाल शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला बॅकफूटवर घेऊन जाईल??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अकरा जागा… अकरा उमेदवार… पण अशातच भर पडली ती ठाकरेंच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची … बारा गडी मैदानात आल्यामुळे निवडणूक लागली… मतदान झालं… आणि आता निकालही लागला… विधान परिषदेच्या कालच्या (Vidhan Parishad Election 2024 Result) निकालात महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आले… तर महाविकास आघाडीकडून प्रज्ञा सातव, मिलिंद नार्वेकर या दोघांनी बाजी मारली… डाव फिस्कटला तो शरद पवार गट पुरस्कृत शेकापच्या जयंत पाटलांचा… कालच्या निकालानं फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा चालला हे पुन्हा एकदा सिद्ध झालं… लोकसभेनंतर विधानसभेच्या आधीच महायुतीची गाडी रुळावर आल्याचं बोललं गेलं… पण बिघडलं ते आघाडीचं… मविआच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग तर केलच पण राजकारणातील वस्ताद म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा हा करेक्ट कार्यक्रम असल्याचंही बोलले जातय… कालच्या विधानपरिषद निकालाचा नेमका अर्थ कसा काढायचा? महाविकास आघाडीचे एकीवर याचा काही इम्पॅक्ट होईल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय चाणक्य ठरलेत, असं आपल्याला बोलता येऊ शकतं का? तेच पाहूया

सर्वात आधी पाहूया विधान परिषदेत महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून आल्याने लोकसभेत डॅमेज झालेल्या फडणवीसांच्या इमेजला या निकालाने उभारी मिळालीये… यापूर्वी 10 जुन 2022 ला राज्यसभा तर 20 जुन 2022 ला विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपला मॅजिक पॅटर्न वापरत मविआला धक्का दिला होता. त्यामुळे मविआ सरकार कोसळले होते. त्यामुळे आताच्या विधानपरिषदेच्या नियोजनाची आणि मतांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच होती. लोकसभेच्या निकालामुळे वातावरण बदलल्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट महायुतीच्या आमदारांची मतं फोडेल, अशी चर्चा होती. मात्र, आज विधानपरिषद निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या जादू कायम असल्याचे दिसून आले.

YouTube video player

2022 ला राज्यसभा आणि विधानपरिषदेत विजयानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी विजयाची हॅट्रिक करुन दाखवली. विधानपरिषेदेच्या गणितांमध्ये फडणवीसांची बेरीज सर्वांवरच भारी पडल्याची चर्चा आता रंगली आहे.त्यांनी सलग पाच टर्म आमदार राहिलेल्या आणि शरद पवार पुरस्कृत उमेदवार असलेल्या जयंत पाटील यांना धोबीपछाड देत वस्तादाचा डाव हाणून पाडला, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागलीय… थोडक्यात लोकसभेच्या निकालातून शरद पवारांकडे गेलेला पॉलिटिकल फोकस फडणवीसांनी पुन्हा एकदा आपल्याकडे शिफ्ट करून घेतलाय, असं म्हणायला हरकत नाही…

या निकालानं आणखीन एक गोष्ट सिद्ध केली ती म्हणजे महाविकास आघाडी फुटीर असल्याची…. होय… विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आता होऊ लागलीय…विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची 2 तर कॉंग्रेसची सहा मते फुटली असा दावा माजी मंत्री आणि भाजप आमदार संजय कुटे यांनी करत महाविकास आघाडीचा पेच आणखीनच वाढवलाय… विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते…. याचा अर्थ कसा आणि काय लावायचा? असा प्रश्न आता राजकीय विश्लेषकांनाही पडलाय… मतं फुटणं, मतं फुटू नयेत याची काळजी न घेणं या सगळ्यातून महाविकास आघाडीच्या इमेजला धक्का तर पोहचला आहेच… पण आघाडी म्हणून असणारी जनतेमधील विश्वासार्हताही गमावून बसलीये, हेच या सगळ्यातून सिद्ध होतं… त्यामुळे भाजपच्या विरोधात मत देऊन निवडून दिलेले आमदारच महायुतीला मदत करत असतील, तर याचा निगेटिव्ह मेसेज मतदारांमध्ये जाण्याची शक्यता आहे… त्याचा तोटा आगामी काळात विधानसभा निवडणुकीतही मविआला भोगावा लागू शकतो…

आता तिसरी गोष्ट येते ती विधानसभेसाठी वातावरण सेट करण्याची…. लोकसभेच्या निकालामुळे महायुती बॅकफुटला गेली होती… विधानसभेलाही मविआला 170 ते 180 जागांवर यश मिळेल, असं राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं होतं… यासाठी हे मविआच्या बाजूने असणार हे मोमेंटम तोडत वार आपल्या बाजूने सेट करण्याची गरज महायुतीला होती… अर्थसंकल्पातून लोककल्याणकारी घोषणांचा पाऊस पाडून त्याचा थोडाफार प्रयत्न ट्रिपल इंजिन सरकारने केला… पण ते पुरेसं नव्हतं… विधानसभेआधी पक्षातील नेत्यांमध्ये आत्मविश्वास दुणावण्याची संधी… पक्षातील नाराजांचं राजकीय पुनर्वसन करण्याची संधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेआधी राज्यातील जातीय समीकरण आपल्या बाजूने वळवण्याची संधी… विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली होती… आणि यात पास होत महायुतीनं हे सर्वकाही सिद्ध करून दाखवलं… अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे…. पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करून माधव फॅक्टर पुन्हा आपल्याकडे वळता करून घेतलाय… थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकीआधी महायुतीनं वारं आपल्या बाजूने सेट करून घेतलय… पक्ष फुटी मुळे निर्माण झालेलं सहानुभूतीचं वार, लोकसभेच्या निवडणुकीचं मोमेंटम हे सगळं तोडण्यात महायुतीला यश आलंय… अर्थात ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी विधानसभेला याचा मोठा लॉस होऊ शकतो….

आता येतो तो शेवटचा मुद्दा तो म्हणजे काँग्रेसची खराब झालेली इमेज…. कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान केलं… म्हणूनच की काय सर्वात कमी जागा लढवून देखील सर्वात जास्त जागा निवडून आणण्याचा रेकॉर्ड काँग्रेसने केला… भाजपच्या प्रभावामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मरगळ आली होती… हीच मरगळ लोकसभेच्या निकालामुळे दूर झाली… काँग्रेससाठी ही नवसंजीवनी असल्याचं बोललं गेलं… हे सगळं काँग्रेसला विधानसभा निवडणुकीला प्लस मध्ये घेऊन जाणार होतं… पण त्याआधीच विधान परिषदेला काँग्रेसची मतं फुटल्यामुळे पक्ष चांगलाच डॅमेज झालाय… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी यामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत… आमदार कैलास गोरंट्याल यांनी मतदाना आधीच पक्षातील फुटीर आमदारांचं वर्णन केलं होतं… निकालातही हे स्पष्ट असल्यामुळे कल्पना असूनही पक्षानं या फुटीर आमदारांवर कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता या निमित्ताने विचारला जातोय… या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले, विधान परिषद निवडणुकीवेळी आम्ही ट्रॅप लावला होता. या ट्रॅपमध्ये बदमाश लोकं सापडलेली आहेत. आम्ही वरिष्ठांना हे कळवलेलं आहे. लवकरच ज्यांनी पक्षविरोधी काम केलं, पक्षासोबत गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल…

थोडक्यात काय तर विधानसभेचा एक एक्स्ट्रा कॅन्डीडेट महाविकास आघाडीने दिला… पण त्याला निवडून आणता आलं नाही… थोडक्यात काय तर आघाडीनं स्वतःच्या हाताने आपल्या बाजूने फिरलेल्या राजकीय वाऱ्याला दूर लोटलय… या सगळ्यातून साध्य काय झालं… काँग्रेसचा संघर्ष चव्हाट्यावर आला… शरद पवार गटाचा उमेदवार पडला… महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग लावला… वस्तादाची तयार झालेली बिग इमेज खोडून काढत चाणक्य पुन्हा वरचढ ठरला… बाकी विधान परिषदेच्या निकालावरून आघाडीत बिघाडी झालीये, असं तुम्हाला वाटतं का? विधान परिषदेचा निकाल विधानसभेला महायुतीच्या विजयाचं कारण ठरू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा..