‘मी विधानपरिषदेचे तिकीट मागितलचं नव्हतं’; चंद्रशेखर बावनकुळेंचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषद तिकीटबाबत सुरु झालेल्या पक्षांतर्गत सुरु असलेल्या वादावर आपलं सोडलं. मी विधानपरिषदेसाठी तिकीट मागितली नव्हते असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. काल एका वृत्तवाहिनीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी आपली भूमिका मांडताना बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्याबाबत दुःख व्यक्त केले.

त्यांनतर आज बावनकुळे यांनी आपली मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ”मला वाटतं पक्षाची भूमिका जो कार्यकर्ता जिथे उपयुक्त आहे, त्यानुसार ठरली असावी. मला आता महाराष्ट्राच्या कोरोनाबाबत कामाकरिता अध्यक्ष नेमले आहे. मी पक्षाचे काम करतोय. विधानसभा निवडणुकीत मला पूर्व विदर्भातील ३२ जागांची जबाबदारी दिली होती. मी विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते,” असे म्हटले आहे. मला असं वाटतं की त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरुन असं चित्र दिसत आहे की आता जुन्या लोकांना तिकीट द्यायचे नाही. नवीन कार्यकर्त्याला द्यायचे. मी नाव पाठवलं नाही आणि तिकीट मागितलं नव्हते. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला त्याबाबत धन्यवाद, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या भूमिकेला सहमती दर्शवली. भाजपची भूमिका ठरली असेल. पक्षाने आमच्याकरिता काय भूमिका घेतली आहे. त्यावेळी योग्य निर्णय घेऊ. पक्ष डावलत आहे, असे आजच्या दोन घटनांवरून म्हणता येत नाही. पुढच्या काळात योग्य जबाबदारी मिळेल, अशी आशाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर खडसे नाराज सध्या नाराज असून त्यांच्या भूमिकेबाबत मी बोलणे योग्य नाही, असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षानं तिकीट नाकारल्याने भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. संसदीय बोर्डाच्या बैठकीत पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या तिघांचीही नावे फायनल झाली असून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात इतरांचीच नावं जाहीर करण्यात आली. ज्यांची नावं जाहीर केली, ते मुंबईत फॉर्म भरण्यासाठी आले कसे? हे सर्व पूर्वनियोजित होतं. आम्हाला केवळ मूर्ख बनवण्यात आलं, असा संताप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment