Vijay Rupani Death : विमान अपघातात माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; देशावर शोककळा

Vijay Rupani Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vijay Rupani Death। गुजरात मधील एअर इंडिया विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झालं आहे. अहमदाबाद विमानतळावरून ते लंडनला जात होते. मात्र या विमानात जे २४२ प्रवासी होते त्यात विजय रूपाणी यांचाही समावेश होता. विजय रूपाणी हे २०१६ ते २०२१ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. ते भाजपचे होते. सहा दशकांपूर्वी बलवंतराय मेहता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता, आता विजय रूपाणी यांच्या रूपाने दुसरा मुख्यमंत्री विमान अपघातात गुजरातने गमावला आहे.

पत्नीला आणण्यासाठी लंडनला निघाले होते- Vijay Rupani Death

विजय रूपाणी यांच्या पत्नी अंजली रुपानी लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी विजय रूपाणी हे लंडनला निघाले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. माजी मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा म्हणाले की त्यांचा गुजरात विद्यापीठात एक कार्यक्रम होता. तिथून परतल्यानंतर ते जेवण करत असताना त्यांना टीव्हीवर अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी मिळाली. त्यांना माहित होते की रुपाणी याच विमानाने लंडनला जाणार आहेत. मात्र, त्यांना हे माहित नव्हते की ते या विमानात आहेत कि नाहीत.. परंतु नंतर विजय रूपाणी हे याच विमानात असल्याचं स्पष्ट झालं. या विमान अपघातात त्यांचं निधन (Vijay Rupani Death) झाल्याचे समोर येत आहे.

विजय रुपाणी हे १९७१ मध्ये ते संघाशी जोडले गेले होते. भाजपच्या स्थापनेपासून ते पक्षासोबत होते. १९७६ च्या आणीबाणीच्या काळात ते ११ महिने तुरुंगात होते. १९९६ ते १९९७ दरम्यान ते राजकोटचे महापौर झाले. १९९८ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात युनिटचे सचिव बनवण्यात आले. २००६ ते २०१२ दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य झाले. २०१३ मध्ये नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ते गुजरात महानगरपालिका वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी राजकोट पश्चिम येथून आमदारकीची निवडणूक जिंकली. २०१४ मध्ये आनंदीबेन पटेल यांच्या सरकारमध्ये त्यांना परिवहन मंत्री बनवण्यात आले. २०१६ मध्ये ते गुजरात भाजपचे अध्यक्ष झाले. ७ ऑगस्ट २०१६ रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले.

दरम्यान, गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटने Mayday!! Mayday!! Mayday असा संदेश जवळच्या एटीसीला दिला होता. मात्र तोपर्यंतच हे कोसळलं. या विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल चालवत होते, तर त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. सुमित सभरवालला 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता, तर क्लाईव्हला 1100 उड्डाण तासांचा अनुभव होता. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत हे विमान थेट एका इमारतीवर आदळलं (Air India Plane Crash) . संपूर्ण देशासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे.